वृत्तसंस्था
नवी दिल्ली – पंजाब विधानसभेच्या निवडणूकीत अकाली दलाबरोबर युती झाल्याचा आनंद बहुजन समाज पक्षाचे नेते आणि मायावतींचे नंबर दोन सतीशचंद्र मिश्रा यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांनी १९९६ च्या निवडणूकीतील आठवणी जागविल्या आहेत. Out of 117 seats, Bahujan Samaj Party (BSP) to contest on 20 seats, and Shiromani Akali Dal (SAD) to contest the remaining 97 seats
त्या निवडणूकीत अकाली दल – बसप युतीने पंजाबमधील लोकसभेच्या एकूण १३ जागांपैकी ११ जागांवर विजय मिळविला होता, याची आठवण सतीशचंद्र मिश्रा यांनी करून दिली. सध्याच्या भ्रष्ट काँग्रेस सरकारचा देखील असाच दारूण पराभव करण्याचा विश्वास मिश्रा यांनी बोलून दाखविला. पंजाबमधले काँग्रेसचे सरकार दलित आणि शेतकरी विरोधी आहे. या सरकारचा भ्रष्ट कारभाराची लक्तरे आम्ही वेशीवर टांगू आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचू असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
पंजाब विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी ९७ जागांवर अकाली दलाचे उमेदवार लढतील, तर २० जागांवर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतील, असे जागावाटप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी जाहीर केले.
अकाली दल आणि बसप यांची युती जाहीर करण्याचा आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. कारण पंजाबमधल्या विजयाची पायाभरणी या युतीतून झाली आहे, असे बादल आणि मिश्रा यांनी सांगितले.
Out of 117 seats, Bahujan Samaj Party (BSP) to contest on 20 seats, and Shiromani Akali Dal (SAD) to contest the remaining 97 seats:
महत्त्वाच्या बातम्या
- G7 मध्ये आज पीएम मोदींचे व्हर्च्युअल संबोधन, कोरोनामुक्त जगासह अनेक मुद्द्यांवर होणार व्यक्त
- दिग्विजय सिंहांची क्लब हाऊस चॅट व्हायरल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यावर पुन्हा बहाल होणार कलम 370!
- एमस्ची आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे न्यायालयाच आदेश
- साखरेला पर्याय ठरणार अमाई प्रथिने, जगात वेगाने संशोधन
- राजस्थानात सचिन पायलट पुन्हा नाराज, कॉंग्रेसमध्ये खळबळ, मनधरणी सुरु