विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची उत्तम निगोशिएटर म्हणून स्तुती केली. त्यांना “मिस्टर प्राईम मिनिस्टर, युआर ग्रेट”, असे लिहून मोठे फोटो बूक भेट दिले. शपथविधीच्या वेळी “वुई मिस्ड यु”असे डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना म्हणाले. पण या वैयक्तिक सौहार्दापलीकडे भारत – अमेरिका संबंधांमध्ये भारताला काय मिळाले?? याचा आढावा घेतल्यावर काही बाबी समोर आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. बैठकीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली असून, ते संपवण्यासाठीच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली आहे.
इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड रूट’ (व्यापार मार्ग)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड रूट (व्यापारी मार्ग) देखील जाहीर केला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश या व्यापार मार्गाच्या निर्मितीसाठी काम करत आहेत. हा मार्ग भारतात सुरू होऊन नंतर इस्रायल, इटली आणि अमेरिकेपर्यंत येईल. चीनच्या रोड अँड बेल्ट प्रोजेक्टला चेक देण्यासाठी हा नवीन ट्रेड रूट महत्त्वाचा आहे.
एफ-३५ जेट्स आणि लष्करी सामग्री
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-३५ लढाऊ विमाने पुरवण्याची घोषणाही केली. या वर्षापासून, आम्ही भारताला अब्जावधी डॉलर्सची लष्करी सामग्री विक्री करणार आहोत. आम्ही भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्याचा मार्गही मोकळा करत आहोत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत राहणारे भारतीय खूप महत्वाचे
ट्रम्प आणि मोदी यांच्यात अमेरिकेत भारताचे आणखी दोन नवीन दूतावास सुरू करण्याबाबत एक मोठी घोषणाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लवकरच बोस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये दोन दूतावास सुरू होणार आहेत. या दूतावासांमुळे भारत आणि अमेरिकेतील जनतेशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील.” अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, यावरही पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.
व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी २०३० पर्यंत त्यांचा द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल. या व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत.
अमेरिकेकडून तेल आणि गॅसचा पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीदरम्यान, तेल आणि गॅस खरेदीबाबत एक मोठा करार झाला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारताचा सर्वात मोठा तेल आणि गॅस पुरवठादार बनणार आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य ऐतिहासिकदृष्ट्या वाढणार आहे.
बांगलादेशचा विषय मोदींवर सोडला
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशचा विषय पंतप्रधान मोदींवर सोडून दिला. बांगलादेशासंदर्भात पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो अमेरिकेला मान्य असेल असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे बांगलादेश संदर्भात निर्णय घेण्याची पूर्ण “मोकळीक” मोदींना मिळाल्याने भविष्यात भारत-बांगलादेश सीमा तसेच बांगलादेश मधल्या अंतर्गत परिस्थितीमध्ये फार मोठा फरक पडू शकतो.
Our talks will add significant momentum to the India-USA friendship : PM Modi
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे + काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!
- Nitish Kumars : भाजपसोबतच्या संबंधांबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले…
- Mamata Banerjee : बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना ११ कोटींची नोटीस पाठवली, आणखी ३ नेते रडारवर