• Download App
    जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्कचा सुरक्षा समितीत भारताकडून पर्दाफाश; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सफल अध्यक्षता our own immediate neighborhood, ISIL-Khorasan (ISIL-K) has become more energetic & is constantly seeking to expand its footprint.

    जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्कचा सुरक्षा समितीत भारताकडून पर्दाफाश; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची सफल अध्यक्षता

    वृत्तसंस्था

    संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत आज भारताने पाकिस्तानात तळ ठोकून बसलेल्या जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा आणि हक्कानी नेटवर्कचा पूर्ण पर्दाफाश केला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत अध्यक्षस्थानावरून बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगातील सर्व देशांना महत्त्वाचा इशारा दिला, की “जोपर्यंत आपण सगळे सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही एकटा सुरक्षित राहू शकत नाही”, अशा शब्दांमध्ये त्यांनी सुरक्षा समितीतील या सर्व देशांनाही सुनावले.  our own immediate neighborhood, ISIL-Khorasan (ISIL-K) has become more energetic & is constantly seeking to expand its footprint.

    दहशतवादासंदर्भात कोणत्याही स्थितीत दुटप्पी भूमिका कोणत्याही देशाने घेता कामा नये. जिथे दहशतवाद आहे. दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, त्या देशांविरुद्ध आणि त्या संघटनांविरुद्ध कोणताही भेदभाव न करता आणि दयामाया न बाळगता कठोर कारवाई केली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन जयशंकर यांनी भारताच्या वतीने केले.

    दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सुरक्षा समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली. या बैठकीचे अध्यक्ष स्थान परराष्ट्रमंत्री एस/ जयशंकर यांनी भूषविले.अध्यक्षीय भाषणाचा महत्त्वाचा मसुदा सुरक्षा समितीने मंजूर केला. यामध्ये दहशतवादाविरोधात सर्व देशांची एकजूट, त्याचबरोबर कोणत्याही दहशतवादी हिंसक कृत्याविरुद्ध “झिरो टॉलरन्स” या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

    या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, की अफगाणिस्तानात आणि आमच्या शेजारील देशात हक्कानी नेटवर्क कार्यरत झाल्याचे गंभीर पडसाद संपूर्ण जगाला दिसत आहेत. भारतात 26 /11 चा मुंबई हल्ला इथपासून ते पुलवामा हल्ल्यापर्यंत अनेक हल्ले आम्हाला पचवावे लागले आहेत. जगातील इतर देशही अशा हल्ल्यांपासून सुरक्षित नाहीत. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करताना जर दुटप्पी भूमिका ठेवली तर ती कारवाई अर्धवट राहील. सर्वंकष होणार नाही आणि त्यातून दहशतवाद तर मुळीच संपणार नाही. त्यामुळे कोणत्याही देशाने ठामपणे दहशतवादाविरोधात उभे राहिले पाहिजे_ असा भारताचा आग्रह आहे.

    जगभरातील कोविड आणि त्यातून उद्भवलेल्या समस्या जेवढ्या खऱ्या आहेत त्यापेक्षाही दहशतवादामुळे जग होरपळले आहे हे जास्त दाहक सत्य आहे, याकडे एस जयशंकर यांनी सुरक्षा समितीतील सदस्य राष्ट्रांत बरोबरच संयुक्त राष्ट्र संघातल्या सर्व सदस्य देशांचे लक्ष वेधले.

    n our own immediate neighborhood, ISIL-Khorasan (ISIL-K) has become more energetic & is constantly seeking to expand its footprint.

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची