• Download App
    'आमचं एन्काउंटर होऊ शकतं', समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान यांनी बोलून दाखवली भीती! Our encounter can be done Samajwadi Party leader Azam Khan expressed fear

    ‘आमचं एन्काउंटर होऊ शकतं’, समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान यांनी बोलून दाखवली भीती!

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना रामपूरहून सीतापूर तुरुंगात हलवण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी माध्यमांसमोर आमचे एन्काउंटर होऊ शकते, असं म्हणत भीती बोलून दाखवलं. यामुळे आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. Our encounter can be done Samajwadi Party leader Azam Khan expressed fear

    समाजवादी पार्टीच्या मातब्बर नेत्यांमध्ये आझम खान यांची गणना होते. अलीकडेच मुलगा अब्दुल्ला आणि पत्नी तनझिन फातिमा यांच्यासह त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते रामपूर कारागृहात होते. दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजता त्यांना रामपूर जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आले.

    जेव्हा त्यांना तुम्हाला अन्य ठिकाणी नेले जात असल्याचे सांगितले गेले आणि मुलगा व वडिलांना वेगळ्या वाहनातून नेण्यात येणार असल्याचे समजेल. तेव्हा आझम खान घाबरले आणि त्यांनी कॅमेराकडे बघत  आमचे एन्काउंटर होऊ शकते, काहीही घडू शकतं असं म्हणत  भीती बोलून दाखवली.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , त्यांना सीतापूर तुरुंगात हलवण्यात आले आहे, मुलगा  अब्दुल्ला आझम खान यांना हरदोई तुरुंगात हलवण्यात आले आहे, तर त्यांची पत्नी आणि माजी राज्यसभा खासदार तनझिन फातिमा रामपूर तुरुंगात राहणार आहेत. आझम यांना बोलेरोमध्ये तर त्यांच्या मुलाला वज्र वाहनातून नेण्यात आले.

    Our encounter can be done Samajwadi Party leader Azam Khan expressed fear

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार