• Download App
    खासदारांना मूळ प्रतीचे संविधान दिले; पण त्यात धर्मनिरपेक्ष - समाजवाद शब्द नसल्याने काँग्रेस नेत्यांना खटकले!!|Original copy of constitution given to MPs; But because it did not contain the word secular-socialism, the Congress leaders were shocked!

    खासदारांना मूळ प्रतीचे संविधान दिले; पण त्यात धर्मनिरपेक्ष – समाजवाद शब्द नसल्याने काँग्रेस नेत्यांना खटकले!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नव्या संसदेत प्रवेश करताना सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना केंद्र सरकारतर्फे मूळ प्रतीचे संविधान दिले, पण त्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द नसल्याने काँग्रेस सह विरोधी नेत्यांना ते खटकले. त्यातून विरोधकांनी नवा वाद निर्माण केला आहे.Original copy of constitution given to MPs; But because it did not contain the word secular-socialism, the Congress leaders were shocked!

    त्याचे झाले असे :

    काल गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जुन्या संसदेतून नव्या संसदेत प्रवेश करताना प्रत्येक खासदाराच्या हातात सरकारने संविधानाची मूळ प्रत दिली. ती परत हातात घेऊन आपला संविधानावर विश्वास आहे, असे प्रतिकात्मकरित्या दाखवत नव्या संसदेत प्रवेश करण्याचा सरकारचा हेतू होता. तो साध्यही झाला.



    पण त्या संविधानाच्या मूळ प्रतींमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द नव्हते. त्यामुळे ते काँग्रेस सह सर्व नेत्यांना खटकले. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी आणि तृणामूळ काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. मात्र सरकारतर्फे कायदे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खुलासा केला. संबंधित प्रति या संविधानाच्या मूळ प्रती आहेत. त्यामुळे त्यात समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नाहीत. कारण मूळ राज्यघटनेत हे शब्द नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

    1976 आणीबाणीच्या काळातील घटना दुरुस्ती

    मूळात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हे दोन शब्द मूळात संविधानाच्या सरनाम्यात सुरुवातीला बिलकुलच नव्हते. घटनाकारांनी सर्व शब्दांवर विचार विनिमय आणि खल करून प्रत्येक शब्द व्यवस्थित निवडला होता. परंतु म, इंदिरा गांधींच्या राजवटीत आणीबाणीच्या काळात 1976 मध्ये घटनादुरुस्ती करून घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर हे दोन शब्द घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे काँग्रेस सरकारने वारंवार सांगितले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन्ही शब्द जणू काही मूळ घटनाकारांनीच संविधानाच्या सरनाम्यात समाविष्ट केल्याचे पर्सेप्शन काँग्रेस नेत्यांनी तयार केले. प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नव्हती. ते 1976 च्या घटनादुरुस्तीत समाविष्ट केले गेले आहेत. त्यामुळे संविधानाच्या मूळ प्रतीत ते असणे शक्यच नव्हते. या प्रती खासदारांना दिल्या. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा संताप झाला आहे.

    यातली दुसरी राजकीय स्टोरी अशी, की आज जे पक्ष काँग्रेस समवेत विरोधात बसले आहेत, त्यातले डावे पक्ष आणि बहुतांश प्रादेशिक पक्ष हे त्यावेळी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात होते. त्यांनी 1976 मध्ये घटनादुरुस्ती केली तेव्हाही त्यांनी विरोधच केला होता. पण आता मात्र राजकीय परिस्थिती बदलून भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर डावे पक्ष आणि काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या बाजूने उभे राहून भाजप सरकारने केलेल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेत आहेत. तसाच आक्षेप त्यांनी खासदारांना संविधानाची मूळ प्रत दिली आणि त्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द नाहीत, असा घेतला आहे.

    Original copy of constitution given to MPs; But because it did not contain the word secular-socialism, the Congress leaders were shocked!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!