विशेष प्रतिनिधी
मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विविध क्षेत्रात ऊल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना “आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार” देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. Organizing Adishakti Inspiration Award Ceremony on the occasion of Women’s Day
या पुरस्काराचे वितरण ८ मार्च रोजी दु.४ ते ६ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई येथे देशाला पहिल्या टेस्टट्युबची भेट देणाऱ्या स्ञी प्रसूतीतज्ञ पदमश्री डॉ.इंदिरा हिंदुजा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
समाजात आपल्या कार्यामुळे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, चूल आणि मूल यापलीकडे जाऊन आपली वेगळी कर्तबगारी दाखवणाऱ्या, आपल्या कार्याने इतर महिलांना प्रेरित करणाऱ्या राज्यभरातील विविध भागातील महिलांचा आदिशक्ती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी संपूर्ण राज्यातील महिलांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची घोषणा देखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई पोलीस प्रमुख संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Organizing Adishakti Inspiration Award Ceremony on the occasion of Women’s Day
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे दौर्यातला भर राजकारणावर नव्हे; विद्यार्थ्यांशी संवादावरच का ठेवला…??
- PM Modi Symbiosis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांना दिला देशाच्या विकासाच्या थीमवर काम करण्याचा मंत्र!!
- आधुनिक सुविधा ही पुण्यातील लोकांची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदगार
- जवानाचा अंदाधुंद गोळीबार ; ४ ठार, ६ जखमी ;साथीदारांवर गोळ्या झाडून स्वत : लाही संपवले