विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रायपूरच्या धर्म संसदेवरून देशभरात हिंदू आणि हिंदूत्व या मुद्द्यावर रणकंदन सुरू आहे आणि महात्मा गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण महाराज अटकेत आहेत. ती रायपूरची धर्मसंसद नेमकी भरवली कुणी होती?, तिचे निमंत्रक कोण होते?, याचा खुलासा निमंत्रण पत्रिकेतून झाला आहे. Organizer of Raipur’s Dharma Parliament and NCP’s Chhattisgarh State President Neelkanth Tripathi !!; Shocking revelation from the invitation magazine
ही धर्मसंसद राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष नीलकंठ त्रिपाठी यांनी भरवली होती. ते स्वतः या परिषदेचे आयोजक होते, असा खुलासा आता निमंत्रण पत्रिकेवरून झाला आहे. नीलकंठ त्रिपाठी संस्थापक असलेल्या नीलकंठ सेवा संस्थांनने ही परिषद आयोजित केली होती.
या परिषदेत अनेक महंतांनी भाषणे करून भाषणे करू इस्लामी दहशतवादाविरुद्ध हल्लाबोल केला होता. याच धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे.
रायपूरच्या धर्म संसदेतील भाषणांच्या मुद्द्यावरून देशात हिंदू आणि हिंदूत्व या मुद्द्यावरून रणकंदन माजले आहे. लिबरल विचारवंत आणि काँग्रेस नेत्यांनी याच धर्म याच धर्म संसदेतील भाषण वरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केले आहे. परंतु प्रत्यक्षात ही धर्मसंसद आयोजित करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस नीलकंठ त्रिपाठी हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातले निमंत्रण पत्रिकेचे आणि नीलकंठ त्रिपाठी यांच्या ट्विटर प्रोफाइलचे ट्विट भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केले आहे.
Organizer of Raipur’s Dharma Parliament and NCP’s Chhattisgarh State President Neelkanth Tripathi !!; Shocking revelation from the invitation magazine
महत्त्वाच्या बातम्या
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे ११ जागांवर वर्चस्व, महाविकास आघाडीकडे 8 जागा, अज्ञातवासातील नितेश राणेंची पोस्ट – गाडलाच!
- अतिवृष्टीमुळे चेन्नईसह तामिळनाडूतील अनेक शहरे पाण्यात; राहुल गांधींचे परदेशातून ट्विट, माझ्या भावना तमीळ जनतेबरोबर!!
- पुष्पराज जैन यांच्यासमवेत अखिलेश यादवांच्या प्रेस कॉन्फरन्सपूर्वीच इन्कम टॅक्सचे छापे!!; समाजवादी पक्षाचा तीळपापड!!
- OMICRON CASES IN INDIA TODAY : भारतात Omicron चे 1270 रूग्ण ! महाराष्ट्र अव्वल ! एकूण 13,154 कोरोना रूग्ण – 33 दिवसांत सर्वाधिक आकडा