• Download App
    नबाब मलिक यांच्याविरोधात सात दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पोलीस अटक करण्याची धमक दाखविणार का?|Order to file a case against Nawab Malik within seven days, will the police threaten to arrest him?

    नबाब मलिक यांच्याविरोधात सात दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पोलीस अटक करण्याची धमक दाखविणार का?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात पुढील ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. मुंबई पोलीस नवाब मलिकांना कधी अटक करते याची सर्व देश वाट पाहत असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.Order to file a case against Nawab Malik within seven days, will the police threaten to arrest him?

    मोहित कंबोज म्हणाले, समीर वानखेडे यांनी महाराष्ट्रातील मंत्री असलेल्या बिघडलेल्या नवाबांविरोधात केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे अ‍ॅट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार केली होती. दिल्लीच्या न्यायालयाने मुंबई पोलिसांना पुढील ७ दिवसात मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यांनी मागील ४ महिन्यात वानखेडे कुटुंबाविरोधात अनेक आरोप केले.



    एका मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करत जातीच्या आधारावर भारताच्या प्रामाणिक अधिकाºयावर आरोप केले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आम्ही या आदेशाचं स्वागत करतो. आता मुंबई पोलीस नवाब मलिकांविरोधात कधी गुन्हा दाखल करते हे पाहणार आहोत.

    नवाब मलिकांना कधी अटक होते यांची सर्व देश वाट पाहात आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. आता त्यांना कधी अटक होते यांची सर्व देश वाट पाहात आहे. जोपर्यंत देशात न्यायालयीन व्यवस्था आहे तोपर्यंत देशातील दीडशे कोटी जनतेचा भारतीय संविधानावर आणि भारतावर विश्वास कायम राहील, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

    Order to file a case against Nawab Malik within seven days, will the police threaten to arrest him?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे