वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरपासून कृषी कायद्यांपर्यंत या सर्व मुद्द्यांवर संसदेचे मूळ कामकाज बंद पाडून अभिरूप संसद भरविण्याचा विरोधकांचा मनसूबा आहे.Opposition’s plan to fill the parliament with a strike by disrupting the basic functioning of the parliament
संसदेचे दिवसभराचे कामकाज काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी गदारोळ करून आज बंद पाडले. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये फक्त सुपरस्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने दोन ऑलिंपिक पदके मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर काँग्रेससह सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लोकसभा आणि राज्यसभा यांचे कामकाज गदारोळ करून बंद पाडले. सरकारला स्वतः मांडत असलेली विधेयके रेटून न्यायची आहेत.
त्यांना विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यायची नाहीत, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. पेगासस स्पायवेअरचा मुद्दा संपूर्ण जगभरात चर्चिला गेलेला असताना मोदी सरकार या विषयावर चर्चा करू इच्छित नाही, असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.
संसदेचे कामकाज बंद पडल्यानंतर विरोधी पक्षांची आज छोटी बैठक झाली. उद्या सर्व विरोधकांची स्वतंत्र बैठक होणार असून त्यामध्ये संसद अधिवेशनात पुढची भूमिका ठरविण्यात येणार आहे. विरोधकांपैकी काही पक्षांचा अभिरूप संसद (Mock Parliament) भरविण्याचा इरादा आहे.
अभिरूप संसद म्हणजे संसदेबाहेर संसदे सारखेच नियम चालवून बैठक घेणे. त्यामध्ये ठराव, विधेयके पास करणे. हे प्रकार करून सरकारवर दबाव वाढविण्याचा विरोधकांचा मनसूबा दिसतो आहे. उद्याच्या बैठकीत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे सहभागी होणार आहेत. अभिरूप संसद भरविण्याचा अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीत घेण्यात येईल.
Opposition’s plan to fill the parliament with a strike by disrupting the basic functioning of the parliament
महत्त्वाच्या बातम्या
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू
- सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार
- पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा
- डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, भारतीय रोखीचा मोहन सोडून करू लागले डिजिटल व्यवहार, जुलै महिन्यात झाला विक्रम