• Download App
    विरोधी ऐक्याला सुरुंग; काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीची खलबतं!!Opposition unity excludes Congress, Mamata - Akhilesh discussions on third front

    विरोधी ऐक्याला सुरुंग; काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीची खलबतं!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारची टक्कर घेताना विरोधकांची एकजूट सर्वात महत्त्वाची असताना विरोधी ऐक्याला कर्नाटकात काँग्रेसने सुरुंग लावत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याबरोबर तिकडे करणार कोलकत्यात काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचे ऐक्य साधण्याची तयारी सुरू झाली आहे. Opposition unity excludes Congress, Mamata – Akhilesh discussions on third front

    समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दोन दिवस कोलकत्यात आहेत आणि त्यांनी कालच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन प्रादेशिक पक्षांच्या तिसऱ्या आघाडी विषयी चर्चा केली आहे. काँग्रेसने लवकर निर्णय घ्यावा असे जरी त्यांनी म्हटले असले तरी समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात काँग्रेस नको आहे, तशीच पश्चिम बंगाल मध्ये देखील ममता बॅनर्जींना काँग्रेसची ऍलर्जी आहे. त्यामुळे आता अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी हे काँग्रेसची एलर्जी असणाऱ्या प्रादेशिक पक्षाच्या शोधात आहेत आणि हा शोध करण्यासाठी त्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. तेलंगणात भारत राष्ट्र समिती, आंध्रामध्ये वायएसआर काँग्रेस किंवा तेलगू देशम, ओरिसात बिजू जनता दल यांच्यासारखे पक्ष त्यांच्याकडे आपणहून चालत येतील. त्यामुळे 2021 च्या निवडणुका पश्चिम बंगालमध्ये जिंकल्यानंतर ममता बॅनर्जींनी स्वतःच सुरू केलेले ऐक्याचे प्रयत्न विरोधी ऐक्यापेक्षा काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांच्या ऐक्य करण्यापर्यंत येऊन ठेपले आहेत.

    समाजवादी पक्षाचे कार्यक्षेत्र तसेही उत्तर प्रदेशच्या कुंपणातच आहे. बाकीच्याही प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांची कुंपणे ओलांडलेली नाहीत. पण त्या सर्व राज्यांमध्ये त्यांचा प्रमुख राजकीय शत्रू भाजप पेक्षा काँग्रेस जास्त आहे आणि म्हणूनच केंद्रात जरी सुरुवातीला त्या प्रादेशिक पक्षांना विरोधी ऐक्यात काँग्रेसचा सहभाग हवा असला तरी तो राज्यांमध्ये नको आहे आणि इथेच खरी विरोधी असली “राजकीय मेख” दडली आहे.

    आता 2024 च्या लोकसभा निवडणुका अतिशय जवळ येत असताना आणि त्यांची रणनीती निश्चित होत असताना प्रादेशिक पक्ष असतील अथवा काँग्रेस असेल यांना एक रणनीती ठरवावीच लागेल आणि याच पॉलिटिकल कम्पल्शन मधून ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव हे प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न करत राहतील आणि काँग्रेसला यात मोठा फटका बसेल ही शक्यता राजकीय पातळीवर व्यावहारिक म्हणूनच पाहावी लागेल.

    Opposition unity excludes Congress, Mamata – Akhilesh discussions on third front

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य