अखेर ठरले. तेलंगणचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांचे राष्ट्रीय राजकारणात यायचेच ठरले!! केसीआर आता काँग्रेसला वगळून बाकीच्या विरोधी पक्षांचे ऐक्य करण्यासाठी “एकला चलो रे” असे म्हणून देशाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. यातला पहिला पडाव चंद्रशेखर राव यांनी राजधानी दिल्लीत टाकला असून यांनी आज दौऱ्याची सुरुवात समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या भेटीने केली आहे. लवकरच ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटणार आहेत. Opposition unity except Congress: Let’s go alone on KCR’s tour of the country
– काँग्रेसला वगळणे पडले भाग
काँग्रेसने आधीच तेलंगणमध्ये केसीआर यांच्या सरकार विरुद्ध रणशिंग फुंकल्याने केसीआर यांना आपल्या विरोधी ऐक्याच्या संकल्पनेतून काँग्रेसला वगळून टाकणे भाग पडले आहे. त्यामुळे ते काँग्रेसच्या विरोधात असणाऱ्या बाकीच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत सुमारे दीड महिन्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. पण या भेटीतून काही फलनिष्पत्ती झाली नाही. नंतर विरोधी ऐक्य थंड्या बस्त्यात गेले.
– दिल्लीनंतर पंजाब, बिहार, बंगालचाही दौरा
पण आता परत चंद्रशेखर राव यांनी राजकीय उभारी घेण्याचा प्रयत्न केला असून यातला पहिला पडाव त्यांनी दिल्लीत टाकला आहे. दिल्लीनंतर ते पंजाब मध्ये कृषी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या 600 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यांना मदतीचे चेक देणार आहेत. या कार्यक्रमाला अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे दोन मुख्यमंत्री ते हजर ठेवणार आहेत. त्यानंतर ते आपला होरा बिहार कडे वळणार आहेत. बिहारमध्ये चंद्रशेखर राव हे गलवान घाटीमध्ये चिनी सैन्याची संघर्ष करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पश्चिम बंगालचा देखील दौरा करणार आहेत.
– आर्थिक दुर्दशा हा फोकस
या संपूर्ण दौऱ्याचा फोकस चंद्रशेखर राव यांनी देशाची “आर्थिक दुर्दशा” हा ठेवला असून ते आपल्या दौऱ्यामध्ये राजकीय नेत्यांच्या बरोबरीने काही अर्थतज्ञांची भेट घेणार आहेत. तेलंगणमध्ये राहुल गांधींनी येऊन चंद्रशेखर राव यांच्या सरकार विरुद्ध जोरदार एल्गार पुकारला. त्यामुळे चंद्रशेखर राव यांना आपल्या विरोधी ऐक्याच्या प्रयत्नातून काँग्रेसला वगळून टाकले भाग पडले. मग आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी काँग्रेस सोडून बाकीच्या पक्षांचे ऐक्य करण्याखेरीज त्यांना कोणताच तरणोपाय नसल्याने आता भाजप आणि काँग्रेस वगळून बाकीच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची राजकीय कवायत करीत आहेत.
– फलनिष्पत्तीचे काय??
के. चंद्रशेखर राव यांनी ही राजकीय कवायत करायला काहीच हरकत नाही. पण प्रश्न हा आहे की, चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटून काहीच फलनिष्पत्ती झाली नाही. मग आता बाकीच्या मुख्यमंत्र्यांना भेटून काही राजकीय “राष्ट्रीय फलनिष्पत्ती” होणार?? की त्या नुसत्याच भेटीगाठी ठरून एकमेकांच्या शुभेच्छांची फुले देणे – घेणे होणार!!, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
Opposition unity except Congress: Let’s go alone on KCR’s tour of the country
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला नवसंजीवनी : उदयपूरच्या चिंतन शिबिरातून राहुल गांधी जोधपुरी सुटात केंब्रिज विद्यापीठात!!
- नवाब मलिकांचे ‘डी’ गॅंगसोबत संबंध; पीएमएलए कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण!!
- CNG Price Hike : पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडर पाठोपाठ सीएनजी दरवाढ!!
- शरद पवार आज ब्राह्मण संघटनांशी काय बोलणार??; पुण्यात चर्चेचे निमंत्रण, पण…