• Download App
    पाटण्याच्या विरोधी ऐक्याला पंढरपुरातून सुरुंग; ठाकरे - पवार - केसीआर प्रेमाचा सव्वा वर्षात अंत!!|Opposition unity breaks in pandharpur, political love of thackeray - pawar and KCR comes to an end within a year

    पाटण्याच्या विरोधी ऐक्याला पंढरपुरातून सुरुंग; ठाकरे – पवार – केसीआर प्रेमाचा सव्वा वर्षात अंत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बिहारची राजधानी पाटण्यात 23 जून रोजी 15 पक्षांच्या मोदीविरोधकांची बैठक झाली असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातूनच विरोधी ऐक्याला सुरुंग लागला आहे. कारण ठाकरे – पवार आणि केसीआर यांचे राजकीय प्रेम अवघ्या सव्वा वर्षात संपले आहे.Opposition unity breaks in pandharpur, political love of thackeray – pawar and KCR comes to an end within a year

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह सोलापुरात आले आहेत. आमदार कै. भारतनाना भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे पोटनिवडणुकीतले उमेदवार भगीरथ भालके यांचा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश होत आहे. उद्या केसीआर हे पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट के. चंद्रशेखर राव यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मटण खाऊन पंढरपूरला येऊ नका. वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असा इशारा दिला, तर केसीआर यांची नियत साफ नाही. एमआयएम यांच्यासारखीच भारत राष्ट्र समिती भाजपची बी टीम आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. याचा अर्थच अवघ्या सव्वा वर्षात ठाकरे -‘पवार आणि केसीआर यांचे राजकीय प्रेम संपुष्टात आले आहे.



    ठाकरे – पवार – केसीआर भेट

    गेल्याच वर्षी 20 फेब्रुवारी 2022 रोजी केसीआर यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांनी मोदी विरोधात देशभर एकजूट करण्याच्या आणाभाका पत्रकार परिषदेत घेतल्या होत्या. पण या आणाभाका आता हवेत विरल्या आणि एसीआर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचेच जुने जाणते आमदार, नेते फोडून भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात मजबूत करण्याचा इरादा अवलंबला. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आता केसीआर यांच्यावर खार खायला लागले आहेत.

     पाटण्याच्या बैठकीला केसीआरची दांडी

    पाटण्याच्या बैठकीत केसीआर सहभागी झाले नव्हतेच. कारण त्या बैठकीत काँग्रेस होती आणि तेलंगणामध्ये भाजप पेक्षा केसीआर यांचा खरा मुकाबला काँग्रेसशी आहे. त्यामुळे काँग्रेस ज्या विरोधी ऐक्यात सामील आहे, त्या ऐक्यात सामील होणे केसीआर यांना राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेताना प्रादेशिक पक्षांची एकजूट हा तिसरा पर्याय चाचपून पाहिला. पण ठाकरे – पवारांनी विरोधी एकजुटीत काँग्रेसचाच मार्ग चोखाळत पाटण्याच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे केसीआर – पवार आणि ठाकरे यांचे राजकीय प्रेम संपुष्टात आले आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे नेते केसीआर यांच्यावर खार खायला लागले आहेत.

    Opposition unity breaks in pandharpur, political love of thackeray – pawar and KCR comes to an end within a year

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ajit Pawar सत्काराकडे पाठ फिरवून 5 माजी मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “करेक्ट साईज कार्यक्रम”; एक विद्यमान आणि दोनच माजी मुख्यमंत्री हजर!!

    Karnataka : कर्नाटकचे मंत्री म्हणाले- मी आत्मघातकी बॉम्बर बनण्यास तयार; पंतप्रधानांनी परवानगी दिली तर युद्ध लढण्यासही तयार

    Ram temple : राम मंदिरातून महाराष्ट्रातील मुस्लिम महिलेला ताब्यात घेतले; संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले