विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंचे सुप्रीम कोर्टातील वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत.Opposition to the renaming of Aurangabad; MP Imtiaz Jalil talks with Uddhav Thackeray’s lawyer Kapil Sibal!!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर देखील या सरकारची आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांची भूमिका नामांतराला अनुकूलच राहिली आहे. पण तरीदेखील खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंचे सुप्रीम कोर्टातले वकील कपिल सिब्बल यांची भेट घेऊन औरंगाबादच्या नामांतर विरोधातील केस त्यांनी सुप्रीम कोर्टात लढवावी, अशी विनंती केल्याचे समजते आहे.
कपिल सिब्बल हे सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे यांची बाजू सुप्रीम कोर्टात लढवत आहेत. ते मूळचे काँग्रेसचे नेते असून राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल त्यांचे काँग्रेसच्या हायकमांडशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून काँग्रेसचा बाहेरचा रस्ता पकडला. मात्र ते आजही काँग्रेसी विचारसरणीशी आपले इमान राखून आहेत.
उद्धव ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडी बनवून काँग्रेस -‘राष्ट्रवादीशी राजकीय संधान साधत महाराष्ट्रात सरकार बनविले. सरकार गेल्यानंतरही उद्धव ठाकरे आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आपले मैत्री निष्ठा कायम ठेवून आहेत. त्यामुळेच कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंचे वकीलपत्र स्वीकारून सुप्रीम कोर्टात त्यांच्या बाजूने लढले आहेत. मात्र ज्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे केले, त्याच नामांतरा विरोधात आता कपिल सिब्बल हे खासदार इम्तियाज जलील यांची बाजूने सुप्रीम कोर्टात लढणार का??, हा प्रश्न तयार झाला आहे आणि ते तसे लढले तर, एकाच वेळी ते ठाकरे आणि इम्तियाज जलील यांचे वकीलपत्र घेऊन महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची राजकीय पंचाईत करणार आहेत.
Opposition to the renaming of Aurangabad; MP Imtiaz Jalil talks with Uddhav Thackeray’s lawyer Kapil Sibal!!
महत्वाच्या बातम्या
- मेरा देश बदल रहा है….! जगातील सर्वात उंच पुतळा, पूल, सर्वात लांब बोगदा, प्लॅटफॉर्म अन् भव्य स्टेडियम बनवून भारताने केला विक्रम
- बार्शीतील ‘त्या’ घटनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधणाऱ्या संजय राऊतांना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…
- कशी होती मुंडे – गडकरी केमिस्ट्री??; गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणात नितीन गडकरींनी सांगितले किस्से
- NIAकडून PFIच्या मुसक्या आळवणे सुरूच; महिनाभरात दाखल केलं पाचवं आरोपपत्र, बँक खातीही गोठवली