• Download App
    विरोधक धर्मांच्या राजकारणात अडकले, उत्तर प्रदेशात भाजपने सामाजिक न्यायाचा डंका|Opposition stuck in politics of religions, BJP in Uttar Pradesh working for social justice

    विरोधक धर्मांच्या राजकारणात अडकले, उत्तर प्रदेशात भाजपने सामाजिक न्यायाचा डंका

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी धर्माचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने यंदाची निवडणूक सामाजिक न्यायाच्या मुद्यावर लढविण्याचे ठरविले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत दलीत आणि ओबीसींना ६८ टक्के तिकिटे देण्यात आली आहेत.Opposition stuck in politics of religions, BJP in Uttar Pradesh working for social justice

    उत्तर प्रदेशातील स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासारखे ओबीसी नेते भाजपला सोडून गेले आहेत. मात्र, ओबीसी आणि दलीतांना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरविले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत भाजपने 107 जणांना तिकिटे दिली आहेत.



    यामध्येओबीसी, दलित आणि महिला उमेदवारांना 68 टक्के तिकिटे दिली आहेत. भाजपने सर्वसाधारण जागेवरही दलित उमेदवारांना तिकीट दिले आहे.भाजपने 83 विद्यमान आमदारांपैकी 63 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 20 उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.

    यात 107 उमेदवारांपैकी 44 ओबीसी, 19 एससी आणि 10 महिला उमेदवार आहेत. त्याचवेळी 43 जागांवर सर्वसाधारण प्रवगार्चे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. याशिवाय एका सर्वसाधारण जागेवरून 1 अनुसूचित जातीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले आहे.

    Opposition stuck in politics of religions, BJP in Uttar Pradesh working for social justice

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट