वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी समविचारी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेतील खर्गे यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत हिंडेनबर्ग रिसर्च आणि अदानी मुद्द्यावरून संसदेत सरकारला घेरण्याची रणनीती तयार करण्याची चर्चा अपेक्षित आहे.Opposition meeting called by Congress president Kharge to prepare strategy on Adani case
सोमवारी राज्यसभेत विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी शुक्रवारी अदानी समूहाच्या व्यवसायाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या त्यांच्या पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
माध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, अदानी घोटाळ्याची चौकशी व्हायला का नको? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अदानींच्या व्यवसायात गुंतवलेल्या पैशावर चर्चा व्हायला नको का? आम्ही जेपीसीच्या मागणीवर ठाम आहोत.
Opposition meeting called by Congress president Kharge to prepare strategy on Adani case
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी आज बंगळुरूत करणार एअरो इंडिया शोचे उद्घाटन : सुपरसॉनिक विमानांचे दिसेल थरारक उड्डाण
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे उद्घाटन : मोदी म्हणाले- सीमेवर रस्ता बांधायला घाबरायची काँग्रेस, त्यांना सैनिकांच्या शौर्यावर संशय होता
- बिग बॉस 16चा किताब पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला : शिव ठाकरे रनरअप, सलमानसाठी प्रियांका चौधरी राहिली खरी विनर
- पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!!