• Download App
    उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप|Opposition in Uttar Pradesh gives tickets to riot-minded people, accuses Prime Minister Narendra Modi

    उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचे राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, ज्याचे आचरणच ते दंगलीच्या मानसिकतेवाले लोक असल्याचे आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.Opposition in Uttar Pradesh gives tickets to riot-minded people, accuses Prime Minister Narendra Modi

    व्हर्च्युअल रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनचौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामांची लेखाजोखा जनतेसमोर मांडला. ते म्हणाले, आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचं राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे,



    ज्याचं आचरणच ते दंगलीच्या मानसिकतेवाले लोक असल्याचे आहे. उत्तर प्रदेशात राहणारी जनता यापूर्वीच्या सरकारला ओळखतात. त्यांनी भ्रष्टाचार आणि रियल इस्टेट माफियाची अशी युती केली एनसीआरमध्ये हजारो घर खरेदीदारांना आपल्या आयुष्यभराची कमाई खर्च करावी लागली. याचं मोठं नुकसान आपल्या मध्यम वर्गाच्या लोकांना सोसावे लागले.

    पंतप्रधान म्हणाले, गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात नव्या शिक्षण संस्था, आयटीआय. नवी वैद्यकीय कॉलेजेस या ठिकाणी खुली झाली. इतकी विद्यापीठंही उभारली गेली, यामागे तरुणांची स्वप्न आणि आकांक्षा आहे. डबल इंजिनचं सरकार उत्तर प्रदेशचा विकास दुप्पट वेगानं करत आहे. मागील सरकारने आपल्या पाच वर्षात गौतम बुद्ध नगरमध्ये केवळ ७३ घरे बांधली आहेत.

    या ५ वर्षात योगी सरकारन जवळपास २३ हजार घरं बांधून शहरी गरिबांना दिली आहेत. कुठे केवळ ७३ घरं आणि कुठे २३ हजार घरं, याचा विचार करा. आज उत्तर प्रदेशात एक्सप्रेस वे, विमानतळांची संख्या दुप्पट होत आहे. उत्तर प्रदेश हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे ५ शहरांमध्ये मेट्रो आहे आणि ५ शहरांमध्ये काम सुरू आहे.नरेंद्र मोदींनी शामली, मुजफ्फरनगर, बागपत, सहारनपुर आणि गौतम बुद्ध नगर या ठिकाणच्या मतदारांना संबोधित केले.

    Opposition in Uttar Pradesh gives tickets to riot-minded people, accuses Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!