• Download App
    हवेत सोडून पुड्या; विरोधकांच्या गुडघ्याला मुंडावळ्या!! Opposition hasty to hold loksabha polls, mamata and nitish predicts early polls

    हवेत सोडून पुड्या; विरोधकांच्या गुडघ्याला मुंडावळ्या!!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुका नियोजित वेळेच्या आधी डिसेंबर 2023 किंवा जानेवारी – फेब्रुवारी 2024 मध्ये होतील, असे भाकीत केले आहे. त्यासाठी ममतांनी तर, भाजपने म्हणे देशातली सगळी हेलिकॉप्टर्स बुक केल्याचे तर्कट दिले आहे. पण ममता आणि नितीश कुमार यांचे विरोधक असलेल्या आणि देशात सत्तेवर असलेल्या मोदी – शाहांचे राजकीय लॉजिक लक्षात घेतले, तर विरोधकांचीच “हवेत सोडून पुड्या, गुडघ्याला बांधल्या मुंडावळ्या!!” अशी अवस्था झाल्याचे दिसून येते. Opposition hasty to hold loksabha polls, mamata and nitish predicts early polls

    बाकीचे सोडा, पण नरेंद्र मोदींचा सत्ताधारी म्हणून गेल्या 20 वर्षांचा इतिहास पाहिला, तर त्यांनी कधी कुठे मुदतपूर्व निवडणुका घेतल्याचा हवाला नाही. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तीन वेळा मुदती पूर्ण केल्या. चौथी मुदत पूर्ण करण्याआधी ते पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर ते 2024 च्या मे महिन्यात मध्ये दुसरी मुदत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

    मोदी असोत वा शाह असो ते कोणतीही स्ट्रॅटेजी जाहीर रित्या बोलून दाखवत नाहीत. डंगोरा तर बिलकुलच पिटत नाहीत. स्ट्रॅटेजी प्रत्यक्ष यशस्वी झाली, की लोक त्याला मोदी – शाहांची रणनीती म्हणतात आणि मग भाजपचे नेते आणि कार्यकर्ते त्याचे ढोल वाजवायला सुरुवात करतात. पण प्रत्यक्ष कुठलीही राजकीय घडामोड घडवून आणण्यापूर्वी मोदी आणि शाह हे बिलकुलच त्याची भनक विरोधकांनाच काय, पण स्वकीयांना देखील लागू देत नाहीत. ही त्यांची राजकीय सवय लक्षात घेतली, तर ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी केलेल्या दाव्यातला फोलपणा लक्षात येईल.

    ममतांची (कम)कुवत!!

    लोकसभेच्या निवडणुका 2023 डिसेंबर मध्येच होतील, असे भाकित ममतांनी तृणमूळ काँग्रेसच्या युवक मेळाव्यात केले. म्हणजे एकतर तो स्वतःच्या राजकीय पक्षाचा मेळावा. त्यातही तो पूर्ण राजकीय पक्षाचा नव्हे, तर युवक शाखेचा मेळावा आणि तिथे ममता बॅनर्जी थेट लोकसभेचे लोकसभा निवडणुकीचे भाकीत करतात. यात त्यांच्या रणनीतीची पातळी आणि त्यात मागची राजकीय बौद्धिक (कम)कुवत दिसते. अशी कोणतीही रणनीती अथवा राजकीय खेळी मोदी – शाह इतक्या उथळपणे करत नाहीत.

    नितीश कुमारांची “समज”

    नितीश कुमार यांनी मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीचे भाकीत करताना राम मंदिराच्या उद्घाटनाचा हवाला दिला. 2024 जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी मुदतपूर्व निवडणुका फेब्रुवारीमध्ये घेतील, असा त्यांचा दावा आहे. जणू काही त्या लोकसभा निवडणुका नियोजित वेळेत घेतल्या, तर भाजप राम मंदिराच्या उद्घाटनाचा फायदा उठवूच शकणार नाहीत, असा नितीश कुमार यांचा समज झाला आहे. पण त्यातून खुद्द त्यांचीच राजकीय “समज” उघड झाली आहे!!

    वास्तविक निवडणुकीतल्या कुठल्याही मुद्द्याचा फायदा घेणे आणि तो अचूक वेळी घेणे यात मोदी आणि शाह माहीर आहेत. त्यासाठी त्यांना दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे “शिकवणी” लावण्याची गरज नाही. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तसेच फेब्रुवारी इंटेरियम बजेट सादर केल्यानंतर त्यात लोकप्रिय घोषणा करून मोदी निवडणुकीला सामोरे जातील हे सांगायला आणि समजायला फार मोठ्या रॉकेट सायन्सच्या अभ्यासाची गरज नाही.

    सरप्राईज एलिमेंट काय??

    पण खरा प्रश्न मोदी आणि शाहांच्या सरप्राईज एलिमेंटचा आहे आणि ते एलिमेंट हे दोन्हीही नेते इतक्या सहजासहजी विरोधकांच्या हाती लागू देतील, ही सुताराम शक्यताच नाही. त्यामुळे ममता असोत, की नितीश कुमार या दोन्ही नेत्यांची मुदतपूर्व निवडणुकीची भाकिते म्हणजे, “हवेत सोडून पुड्या, गुडघ्याला बांधल्या मुंडावळ्या!!, असेच ठरणार आहे.

    Opposition hasty to hold loksabha polls, mamata and nitish predicts early polls

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले