विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधक “सुधारले” आणि नव्या संसदेवरील ध्वजारोहण कार्यक्रमास आज हजर राहिले. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या हस्ते नव्या संसद भवनावर आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यासह निवडक विरोधी पक्षांचे खासदार हजर होते. Opposition boycotted inauguration of new parliament, but attends flag hoisting
वास्तविक ध्वजारोहण कार्यक्रमाचे निमंत्रण सगळ्यांनाच होते, पण विरोधकांचे निवडक खासदारच हजर राहिले. तरी देखील संसद भवनाचे उद्घाटन ते संसद भवनावरचे ध्वजारोहण या कार्यक्रमांमधला महत्त्वाचा फरक समोर आला, तो म्हणजे नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेस सह सर्व विरोधकांनी बहिष्कार घातला होता. पण ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी मात्र निवडक विरोधक हजर राहिले.
28 मे 2022 रोजी सावरकर जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. तेथे संपूर्ण भारतीय राजवटीचे प्रतीक म्हणून सेंगोलची प्रतिष्ठापना केली. मात्र, तो कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या स्ते झाला या कारणास्तव सर्व विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला होता. आज मात्र उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह निवडक विरोधक हजर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मात्र, सरकारी पातळीवर नव्या संसद भवनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची मोदींचा वाढदिवस जोडलेला नाही, तरीदेखील काही विरोधकांनी स्वतःहून तो कार्यक्रम मोदींच्या वाढदिवसाची जोडला. अधीर रंजन चौधरी आणि फारूक अब्दुल्ला यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नव्या संसद भवनाची आम्ही वाट पाहत होतो. आता नवीन संसद भवनात लवकरच भेटू, असे डॉ. फारूक अब्दुल्ला म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे निमंत्रण होते. परंतु ते सध्या हैदराबाद मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित असल्याने ध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहू शकले नाहीत. कार्यक्रमाची पत्रिका आपल्याला उशिरा मिळाली असे त्यांनी सांगितले. पण एकूण नव्या संसद भवनाचे उद्घाटन आणि त्यावरचे ध्वजारोहण या कार्यक्रमांमधल्या फरकातून विरोधक “सुधारल्याचे” दिसून आले!!
Opposition boycotted inauguration of new parliament, but attends flag hoisting
महत्वाच्या बातम्या
- अमृता देशमुख चा होणाऱ्या नवऱ्यासाठी खास उखाणा! समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल
- ”जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे, ते कधीच…” अमित शाह यांचे विधान!
- बहुजनांनी तुम्हा उच्चवर्णीयांसाठी फक्त बलिदानच द्यायचे का??; सुजात आंबेडकरांनी रोहित पवारांना फटकारले
- लष्कराने घेतला हौतात्म्याचा बदला, बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; अनंतनागमध्येही कारवाई सुरूच