• Download App
    तरुणींसाठी संधी : आयटी कंपन्यांमध्ये महिलाशक्ती, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ६० हजारांवर महिलांना देणार नोकरी|Opportunities for young women: Women power in IT companies, giving jobs to over 60,000 women through campus interviews

    तरुणींसाठी संधी : आयटी कंपन्यांमध्ये महिलाशक्ती, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ६० हजारांवर महिलांना देणार नोकरी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: आयटी कंपन्यांमध्येही आता महिलाशक्तीला प्राधान्य देणार आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी यंदाच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू मधून ६० हजारांवर महिलांना नोकरी मिळणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक सारख्या आयटी कंपन्यांनी आपल्या मनुष्यबळात स्त्री-पुरुषांचे प्रमाण पन्नास-पन्नास टक्के करण्यासाठी पावले उचलली आहे. सध्या आयटी क्षेत्रात ३३ टक्के महिलाच काम करत आहेत.Opportunities for young women: Women power in IT companies, giving jobs to over 60,000 women through campus interviews

    एचसीएल यंदाच्या वर्षी कॅम्पसमधून ६० टक्के नवीन महिला कर्मचारी नियुक्त करणार आहे. विप्रो आणि इन्फोसिस यांनी प्रत्येक एंट्री-लेव्हलला महिला आणि पुरुषांचे प्रमाण निम्मे निम्मे करण्याचे ठरविले आहे. सध्या आयटी कंपन्यांमध्ये महिलांची संख्या ३८ ते ४५ टक्के आहे.



    एचसीएल टेक, या वर्षी कॅम्पसमधून 22,000 फ्रेशर्स घेण्याची योजना आखत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तरुणींना संधी देऊन कंपनीतील स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान करण्याचे ठरविले आहे.

    इन्फोसिसचे एचआर हेड रिचर्ड लोबो म्हणाले की, एंट्री लेव्हललाच स्त्री-पुरुषांचे प्रमाण पन्नास टक्के असावे असे आमचे धोरण आहे. मात्र, आम्ही गुणवत्तेला महत्व देतो. गुणवत्तेमध्ये महिला कोठेही कमी नाहीत. त्यामुळे २०३० पर्यंत इन्फोसिस ४५ टक्के महिला कर्मचारी असाव्यात यासाठी भर दिला जात आहे.

    2022 या आर्थिक वषार्साठी ३५ हजार महाविद्यालयीन पदवीधरांची नियुक्ती करण्याची त्यांची योजना आहे. यंदाच्या वर्षी इन्फोसिसमध्ये ८,३०४ नवी कर्मचाऱ्यांची भरती करण्यता आली आहे. त्यामुळे इन्फोसिस कंपनीमधील कर्मचाºयांची संख्या २ लाख ६७ हजार ९५३ इतकी झाली आहे. सध्याइन्फोसिसमध्ये एकूण कर्मचाऱ्यांमध्ये ३८.६ टक्के महिला अहेत.

    टीसीएसनेही महिलांना नियुक्तीसाठी योजना तयार केली आहे. यंदाच्या वर्षी १५ ते १८ हजार महिला कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या आर्थिक वर्षात भारतातील कॅम्पसमधून ४० हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. कंपनीमध्ये सध्या १ लाख ८५ हजार महिला कर्मचारी आहेत.

    विप्रो कंपनी या आर्थिक वर्षात १२ हजार फ्रेशर्सला संधी देणार आहे. मागील वर्षीपेक्षा ही संख्या ३३ टक्यांनी जास्त आहे. सध्या विप्रोच्या कर्मचाºयांमध्ये ३५ टक्के महिला असणार आहेत.

    Opportunities for young women: Women power in IT companies, giving jobs to over 60,000 women through campus interviews

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!