वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने चिनी मोबाईल कंपन्यांच्या बेकायदेशीर व्यवहाराच्या मुद्द्यांवर त्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. Oppo company on the radar of revenue intelligence system
डीआरआय (DRI) अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या OPPO कंपनीशी संबंधित चौकशीत या कंपनीने सुमारे 4,389 कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडविल्याचे उघडकीस आले आहे. ओप्पो इंडिया ही कंपनी भारतात मोबाईल फोन आणि फोनशी संबंधित इतर वस्तूंचे उत्पादनांची विक्री करते.
चुकीच्या पद्धतीने 2981 कोटींची कर सवलत
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ओप्पो मोबाइल हे Oppo India च्या नावाने ओळखले जातात. Oppo India विरोधात DRI कडून चौकशी सुरू होती. यामध्ये 4389 कोटींची करचोरी समोर आली आहे. या तपासादरम्यान DRI ने ओप्पो इंडियाचे कार्यालय आणि व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या काही प्रमुख व्यक्तींच्या घराची झडती घेतली. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तऐवज सापडले आहेत. या माहितीच्या आधारे ओप्पो इंडियाला चुकीच्या पद्धतीने 2981 कोटींच्या कराची सवलत मिळाली. DRI ने केलेल्या चौकशीत कस्टम अधिकाऱ्यांना आयात दरम्यान ओप्पोने चुकीची माहिती दिली असल्याचेही समोर आले आहे.
4,389 कोटी रुपयांचे सीमाशुल्क चुकवले
चौकशीअंती, महसूल गुप्तचर विभागाने ओप्पो इंडिया कंपनीला करणे दाखवा नोटीस जारी केली असून त्यात 4,389 कोटी रुपयांचे सीमाशुल्क भरण्याचा आदेश दिला आहे. तसेच या नोटिशीद्वारे ओप्पो इंडिया कंपनीचे कर्मचारी तसेच ओप्पो चीन या कंपनीला सीमा शुल्क कायदा, 1962 अन्वये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे.
Oppo company on the radar of revenue intelligence system
- महत्वाच्या बातम्या
- 2023 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होणार : UNचा दावा- या वर्षी 15 नोव्हेंबरला जागतिक लोकसंख्या 8 अब्जांवर
- दीपक केसरकरांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचा बाळासाहेब – पवारांच्या मैत्रीचा दावा!!
- Rhea Chakraborty Drugs Case : सुशांतच्या व्यसनासाठी रिया पुरवायची गांजा-चरस, भाऊ शौविकचेही नाव एनसीबीच्या आरोपपत्रात
- शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवारांचाच हात!!; दीपक केसरकरांचा दिल्लीतून हल्लाबोल