देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवण्यास आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या सीमा, सैन्य आणि नागरिकांवर वाईट नजर ठेवणाऱ्यांना भारताचे योग्य उत्तर असल्याचे वर्णन केले आहे.Amit Shah
पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत शाह यांनी इंटरनेट माध्यमांवर होणाऱ्या देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवण्यास आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे.
या बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि बंगालचे मुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल तसेच गृह मंत्रालय, गुप्तचर विभाग, बीएसएफ आणि सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्यांचे अभिनंदन केले. बैठकीत शाह म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिलेलं प्रत्युत्तर संपूर्ण जगाला एक मजबूत संदेश आहे.
Operation Sindoor Amit Shah in action special instructions given in meeting of border states
महत्वाच्या बातम्या
- भारताने 13 देशांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, या ४ मुद्द्यांवर होता फोकस
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले
- Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप
- सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण