माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या सर्व नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या भीषण हल्ल्यानंतर, भारत सरकारच्या “ऑपरेशन अजय” अंतर्गत आणखी 286 नागरिकांना इस्रायलच्या युद्ध वातावरणातून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना नवी दिल्लीत आणण्यात आले आहे. यामध्ये नेपाळच्या 18 नागरिकांचाही समावेश आहे. Operation Ajay The plane returned to Delhi with 286 more citizens from Israel 18 Nepalis were also evacuated safely
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या सर्व नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले. ऑपरेशनचा एक भाग म्हणून या सर्वांना विशेष चार्टर्ड विमानाने मायदेशी आणण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, ऑपरेशन अजय अंतर्गत 18 नेपाळी नागरिकांसह 286 प्रवासी पाचव्या विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये विमानतळावर प्रवाशांचे स्वागत करताना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांचे छायाचित्रेही त्यांनी शेअर केले आहे. केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने आलेल्या प्रवाशांमध्ये राज्यातील २२ लोक होते.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, स्पाईसजेट विमान A340 मध्ये रविवारी तेल अवीवमध्ये उतरल्यानंतर तांत्रिक समस्या उद्बवली होती. ही समस्या दूर करण्यासाठी विमान नंतर जॉर्डनला पाठवण्यात आले. तांत्रिक बिघाड दुरूस्त केल्यानंतर, विमान मंगळवारी तेल अवीवहून लोकांना घेऊन परतले.
Operation Ajay The plane returned to Delhi with 286 more citizens from Israel 18 Nepalis were also evacuated safely
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींशिवाय काँग्रेसकडून कोण असू शकतो पंतप्रधानपदाचा उमेदवार? शशी थरूर यांनी केला खुलासा
- समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टाने ३ विरुद्ध २ मतांनी फेटाळली!!; का?? आणि कशी?? वाचा तपशील!!
- ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
- Same Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार