• Download App
    पंजाबमध्ये कॅप्टन - भाजप युतीचा मार्ग मोकळा; काँग्रेसमध्ये फुटीची धास्ती; निवडणूक जाणार सुरक्षेच्या मुद्द्यावरOpen the way for Captain-BJP alliance in Punjab

    पंजाबमध्ये कॅप्टन – भाजप युतीचा मार्ग मोकळा; काँग्रेसमध्ये फुटीची धास्ती; निवडणूक जाणार सुरक्षेच्या मुद्द्यावर

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंती प्रकाश पर्वाच्या निमित्ताने निमित्ताने तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंजाब विधानसभेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांची पंजाब लोक काँग्रेस आणि भाजप यांच्या नव्या युतीचा मार्ग मोकळा केला आहे.Open the way for Captain-BJP alliance in Punjab

    तीन कृषी कायदे हा पंजाब मध्ये अत्यंत वादग्रस्त मुद्दा बनला होता आणि तोच कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासाठी चिंतेचा विषय होता. काँग्रेसशी त्यांचा उभा दावा तयार झाल्यानंतर अनेकदा उघडपणे भाजपशी युती करायची तयारी दाखवली होतीच, फक्त त्यामध्ये कृषी कायदे या विषयाचा अडथळा होता. पंतप्रधान मोदींनी आज कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून हा अडथळा दूर केला आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदरसिंग आणि भाजप यांना पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्यास आता कोणताच अडथळा उरलेला नाही आणि इथेच पंजाब ची निवडणूक संपूर्णपणे फिरण्याचे आपल्याला दिसते.

    पंजाबची निवडणूक कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याकडे वळण्याची दाट शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या दोन्ही दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. या मुद्द्यावर अकाली दलाचे भाजपशी मतभेद नाहीत. त्यामुळे अकाली दलाचीही मोदींनी पुरती गोची करून ठेवली आहे. कृषी कायदे मागे घेतल्यानंतर भाजपशी त्यांचे भांडण उरलेले नाही. आता कोणत्या नव्या मुद्द्याच्या आधारे अकाली दल प्रचार करणार? हा यक्षप्रश्न सुखविंदर सिंग बादल यांच्यापुढे उभा राहणार आहे.


    कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, नवा पक्ष काढणार, पंजाबमधील सर्व 117 जागांवर निवडणूक लढवणार


    तीन कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन हा पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला असता. तो आता तसा येत्या दोन महिन्यांमध्ये उरणार नाही. अशा स्थितीत भाजप विरोधकांना तिथे नवा मुद्दा शोधावा लागेल. काँग्रेस आज ८० आमदारांच्या ताकदीतून सत्तेत असली तरी सगळेच्या सगळे ८० आमदार हे तिथे काँग्रेसचे निष्ठावंत नाहीत. आता कृषी कायद्यांचा मुद्दा बाजूला झाल्यानंतर दस्तुरखुद्द काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे समर्थक बंड करून उचल खाण्याची शक्यता आहे आणि कदाचित निवडणुकीपूर्वीच पंजाब मधले सरकार गटांगळी खाण्याच्या स्थितीत येऊन ठेपेल. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसची घोषणा करताना याचे एकदा सूतोवाच केले होते. परंतु त्यावेळी ती बातमी दुर्लक्षित झाली. कॅप्टन साहेबांच्या इशाऱ्याकडे त्या वेळी फारसे कोणी लक्ष दिले नाही. पण पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणाच पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यांनी कितीही आव आणला असला तरी ते स्वतः नवज्योत सिंग सिद्धू यांच्या दबावाखाली काम करताना दिसत आहेत. आता जेव्हा कॅप्टन साहेब राजकीय दृष्ट्या पुन्हा सक्रिय होतील तेव्हा चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातली फूट अधिक गहिरी होताना दिसेल. पंजाब मध्ये काँग्रेसपुढे आम आदमी पक्षाने आधीच आव्हान उभे केले आहे. त्यात कॅप्टन अमरिंदरसिंग आणि भाजप युती नव्याने निवडणुकीत शिकल्यानंतर जो राजकीय समीकरणांमध्ये बदल होईल, त्यामध्ये काँग्रेसच्या सर्व राजकीय संधी संपूर्णपणे काळवंडलेल्या दिसतील.

    पंतप्रधान मोदींच्या आजच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे पंजाब पुरते हे राजकीय अपरिहार्य परिणाम असल्याचे दिसून येते.

    Open the way for Captain-BJP alliance in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट