वृत्तसंस्था
उस्मानाबाद : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज ६० हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. नवरात्र काळात तीन दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू आहे. तसेच तुळजापूर येथे संचारबंदीचे आदेश लागू आहे.Only those are allowed to take darshan of Tulja Bhavani’s who have Taken both doses of the Anti-coronavaccine
नवरात्र काळात कोरोना लसीचे २ डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे त्यात 7 ऑक्टोबर घटस्थापना दिवशी पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी व परिसरात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार असुन सॅनिटायझर,मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळावे लागतील.
तीन दिवस जिल्हा बंदी
पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून नागरिक तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.
पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस, पौर्णिमेच्या दिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी असणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
शारदीय नवरात्र महोत्सवास २९ सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात होणार आहे या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.
- ७ ऑक्टोबर – देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे.
- ८ ऑक्टोबर – श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना,
- ९ ऑक्टोबर – रथ अलंकार महापूजा
- १० ऑक्टोबर – ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
- ११ ऑक्टोबर – शेषशाही अलंकार महापूजा
- १२ ऑक्टोबर – भवानी तलवार अलंकार महापूजा
- १३ ऑक्टोबर -महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा
- १४ ऑक्टोबर – घटोत्थापन
- १५ ऑक्टोबर – विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे.
त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.
Only those are allowed to take darshan of Tulja Bhavani’s who have Taken both doses of the Anti-coronavaccine
महत्त्वाच्या बातम्या
- Bhawanipur By-polls : बंगालमध्ये तृणमूलचा पुन्हा हिंसाचार, भवानीपूरमध्ये भाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या गुंडांचा हल्ला
- राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड
- Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली