• Download App
    पाच राज्यांतील पराभवाला फक्त आणि फक्त गांधी कुटुंबच जबाबदार, कॅ. अमरिंदर सिंग यांचा आरोप|Only the Gandhi family is responsible for the defeat in five states. Allegation of Amarinder Singh

    पाच राज्यांतील पराभवाला फक्त आणि फक्त गांधी कुटुंबच जबाबदार, कॅ. अमरिंदर सिंग यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकातील पराभवासाठी फक्त आणि फक्त गांधी कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे.
    कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, काँग्रेसचा पराभव केवळ पंजाबमध्येच नाही तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही झाला आहे.Only the Gandhi family is responsible for the defeat in five states. Allegation of Amarinder Singh

    पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवासाठी पूर्णपणे गांधी कुटुंब जबाबदार आहे. वस्तुस्थिती अशी आहे की देशभरातील लोकांचा गांधींच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे. ज्या दिवशी काँग्रेस हायकमांडने नवज्योत सिंग सिद्धू यांसारख्या अस्थिर व्यक्तीला पाठिशी घालण्याचा निर्णय घेतला आणि चरणजीत सिंह चन्नी यांसारख्या भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडले त्याच दिवशी काँग्रेसचा पंजाबमध्ये पराभव झाला होता.



    मी २०१७ पासून पक्षासाठी प्रत्येक निवडणूक जिंकली होती असे सांगून कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील जिंकल्या. पण, काँग्रेस हायकमांड सर्व विसरले. सध्याच्या काँग्रेसला काहीही भविष्य नाही. मला काँग्रेसला स्पष्टीकरण देणे बंधनकारक नाही.

    पण, पंजाबच्या लोकांसाठी मी काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया देत आहे. त्यांच्या सरकारच्या कामगिरीचा अहवाल ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी काँग्रेस सोडणार असं कळल्यानंतर स्वत: सोनिय गांधी यांनी २०२२ च्या निवडणुकीत मी पक्षाचं नेतृत्व करावं असा आग्रह धरला होता.

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर पक्षाने चरणजीत चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

    अमरिंद सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस या नवीन पक्षाची स्थापना केली. पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले. आता भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये आपची सत्ता स्थापन झाली आहे.

    Only the Gandhi family is responsible for the defeat in five states. Allegation of Amarinder Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार