• Download App
    अजितदादांचे मुख्यमंत्रीपद फक्त मोदी - शाहांवर अवलंबून, बाकीच्यांवर नाही; प्रकाश आंबेडकरांनी काढली अजितनिष्ठांची हवा!! Only Modi and Shah would be instrumental for making ajit pawar chief minister, no other leaders have the capacity to do it!!

    अजितदादांचे मुख्यमंत्रीपद फक्त मोदी – शाहांवर अवलंबून, बाकीच्यांवर नाही; प्रकाश आंबेडकरांनी काढली अजितनिष्ठांची हवा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कितीही लावली असली, तरी त्यांचे मुख्यमंत्री पद फक्त दोघांवर अवलंबून आहे, त्यांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही आहेत आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे फक्त तीनच माणसे सांगू शकतील, ती म्हणजे मोदी – शाह आणि स्वतः अजित पवार हीच आहेत. बाकी कोणी नाही, अशी स्पष्टोक्ती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. Only Modi and Shah would be instrumental for making ajit pawar chief minister, no other leaders have the capacity to do it!!

    मोदी – शाहांनी अजित पवारांना शिवसेना – भाजप आघाडी घेऊन उपमुख्यमंत्री केले. त्यांना त्यांच्या आवडीचे अर्थ खाते दिले तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजितदादा मुख्यमंत्री होण्याचे हौस भागलेली नाही. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात काही ठिकाणी लावली.

    या पार्श्वभूमीवर पवारनिष्ठ माध्यमांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पेरत ठेवली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकरांनी परखड मत नोंदविले. अजित पवारांना मुख्यमंत्री करणे हे सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याच हातात आहे. बाकी कोणाच्या नाही. इतकेच नाहीतर मुख्यमंत्री होतील की नाही हे फक्त मोदी – शाह आणि स्वतः अजित पवारच सांगू शकतील, असे परखड मत नोंदवून प्रकाश आंबेडकरांनी अजितदादा समर्थकांच्या पोस्टर्स मधली हवा काढून घेतली.

    Only Modi and Shah would be instrumental for making ajit pawar chief minister, no other leaders have the capacity to do it!!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू, सैनिकांना सांगितले – तयार राहा, देवाची इच्छा असेल तर लवकरच संधी मिळेल

    Upendra Dwivedi : इतिहासजमा व्हायचे नसेल तर दहशतवाद संपवावा लागेल. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

    CJI Gavai : CJI गवई म्हणाले- बुलडोझर कारवाई म्हणजे कायदा मोडणे, सरकार एकाच वेळी न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद असू शकत नाही