• Download App
    जल्लीकट्टूमध्ये फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच परवानगी, संकरित बेलांना बंदीचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय|Only local breed bulls allowed in Jallikattu, Madras High Court bans hybrid bulls

    जल्लीकट्टूमध्ये फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच परवानगी, संकरित बेलांना बंदीचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामीळनाडूतील जल्लीकट्टू या खेळात फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच सहभागी करण्याची परवानगी द्यावी असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. संकरित किंवा विदेशी जातीच्या बैलांना स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.Only local breed bulls allowed in Jallikattu, Madras High Court bans hybrid bulls

    चेन्नईच्या ई. शेषन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेला परवानगी देताना न्यायमूर्ती एन. किरुबाकरन आणि पी. वेलमुरुगन यांनी हा निर्णय दिला जात आहे. स्थानिक जातीच्या बैलांची संख्या कमी होत आहे अशी चिंता व्यक्त करून न्यायालयाने राज्य सरकारला म्हटले आहे की शेतकºयांनी स्थानिक जातीच्या बैलांची पैदास करावी यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी सबसिडीची तरतूद करावी.



    जल्लीकट्टूमध्ये सहभागी होण्यापूर्वी पशुवैद्यकांनी बैलांना प्रमाणित करणे आवश्यक आहे. संकरित किंवा विदेशी जातीच्या बैलांना खोटे प्रमाणित केल्यास न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    न्यायालयाने म्हटले अहे की, सरकारने शक्य तितक्या प्राण्यांचे कृत्रिम रेतन टाळावे. कोरण त्यामुळे प्राण्यांचा विणीचा अधिकार नाकारला जातो. 1960 च्या क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार ही एक प्रकारची क्रुरताच ठरते.

    पूर्वी पोंगलसारख्या सणाच्या वेळी सजविलेल्या बैलांच्या मिरवणुका निघायच्या. मात्र, आता गावातही स्थानिक जातीच्या बैलांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे या मिरवणुका निघत नाही, अशी खंतही न्यायालयाने म्हटले आहे.

    राज्य सरकारने 2017 मध्ये जल्लीकट्टू आयोजित करण्यासाठी कायदा केला होता आणि त्या कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट पुलिकुलम, उंबलाचेरी, नट्टूमाडु, मलैमाडू आणि कांगेयम या मूळ जातींचे रक्षण करणे होते. 2017 चा हा कायदा स्वत: जल्लीकट्टूच्या उद्देशाने देशी बैलांच्या संरक्षणासाठी आहे.

    संकरित किंवा आयात केलेल्या बैलांना जागा नाही. जर ते केले गेले तर ते कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्याला कायद्याची मंजुरी मिळणार नाही, याची आठवणही न्यायालयाने करून दिली आहे.

    विदेशी जातीच्या बैलांची वशिंडे भक्कम नसतात. त्यामुळे जल्लीकट्टूसारखा खेळ खेळणे त्यांच्यासाठी अवघड असते. याउलट देशी जातीच्या बैलांची वशिंडे मोठी असल्याने त्यांना या खेळात सहभागी होणे शक्य होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

    बैलांना गर्दीत सोडून देण्याचा खेळ म्हणजे ‘जलीकट्टू’. तामिळनाडूतील या प्रसिद्ध पारंपरिक खेळाला ‘मंजू विरट्टू’ असेही म्हटले जाते. कित्येक शतके जुना असा हा प्राचीन खेळ खेळण्याची परंपरा तामिळनाडूत जपली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी आणली होती. मात्र, देशी जातीच्या बैलांचे संरक्षण करण्यासाठी या खेळाला परवानगी दिली जाते.

    Only local breed bulls allowed in Jallikattu, Madras High Court bans hybrid bulls

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य