विशेष प्रतिनिधी
मुंबई : अख्खा शरद पवार गट दाखवतोय संघर्षातून भविष्याची आशा; पण त्यांच्याच गटातले एकटेच जितेंद्र आव्हाड बोलताहेत 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या राजकीय हत्येची भाषा!!, असे खरंच शरद पवार गटातून घडत आहे. Only jitendra ached in sharad pawar faction using negative language of political assassination of pawar
निवडणूक आयोगात झालेल्या संघर्षात अजित पवारांनी शरद पवारांवर मात करत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह कायद्याच्या कसोटीवर घेऊन गेल्यानंतर शरद पवार गटाचे सगळे नेते संघर्षाची भाषा करून भविष्यात आपल्याला सत्ता मिळण्याची आशा दाखवत आहेत, पण एकटे जितेंद्र आव्हाड हेच अजित पवार शरद पवारांच्या मरणाची वाट बघत आहेत. शरद पवार नावाच्या 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या राजकीय हत्येचे मोठे कटकारस्थान रचले जाते आहे, असा आरोप करत आहेत.
दिल्लीत बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांनी चूक केल्याचाही आरोप केला. एक तर सुप्रीम कोर्टाच्या निकालात विसंगती आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार आणि अजित पवार यांच्या 2019 पासूनच मतभेद होते, पण शरद पवारांनी त्यांना 2019 मध्ये माफ करून उपमुख्यमंत्री केले होते हे सुप्रीम कोर्ट विसरले. पण मूळात शरद पवारांनी 2019 मध्ये अजित पवारांना माफ करून उपमुख्यमंत्री केले हीच फार मोठी चूक केली. त्यांनी गद्दारांना माफ करायलाच नको होते. तेच गद्दार आता त्यांच्यावर उलटले आहेत, असा आरोपही आव्हाडांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील या सगळ्यांच्या तोंडी संघर्ष करून नवा पक्ष उभा करण्याची भाषा आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढत देऊ. पक्ष परत मिळवू आणि परत मिळाला नाही तर नवा पक्ष उभारून महाराष्ट्रात लढू, असे हे सगळेच नेते म्हणत आहेत. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर शरद पवारांच्या समर्थकांनी “चिन्ह तुम्हारा, बाप हमारा” अशी पोस्टर्स लावली आहेत. रोहित पवारांचा फोटो लावून “वारसा विचारांचा, वाट संघर्षाची”, असे त्यावर लिहिले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एकटे जितेंद्र आव्हाडच शरद पवारांचा उल्लेख 84 वर्षांचा म्हातारा असा करून त्यांच्या राजकीय हत्येचा आरोप करणारी आक्रस्ताळी आणि नकारात्मक भाषा वापरत आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या नेमक्या राजकीय भूमिकेविषयी दाट शंका निर्माण झाली आहे.
स्वतः शरद पवार मी काय म्हातारा झालो का??, तुम्ही माझे काय बघितले??, तुमच्या पाठिंबा असेपर्यंत मी उभा राहणार. थांबणार नाही, थकणार नाही!!, असे उद्गार काढून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जितेंद्र आव्हाड मात्र पवारांच्या वयावर बोट ठेवून राजकीय हत्येची नकारात्मक भाषा वापरत आहेत. यामुळे खुद्द पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनातही शंकेची पाल चूकचुकायला लागली आहे.
Only jitendra ached in sharad pawar faction using negative language of political assassination of pawar
महत्वाच्या बातम्या
- दमलेल्या काकाची कहाणी
- NCP : सुप्रिया सुळे या “वाय. एस. शर्मिला” का होऊ शकत नाहीत??
- NCP : “मी राष्ट्रवादी पार्टी” किंवा “स्वाभिमानी राष्ट्रवादी”, “उगवता सूर्य”; पक्षाचे नवे नाव आणि चिन्हावर शरद पवार गटात खलबते!!
- NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर पवारांची “ताजी” प्रतिक्रिया नाही; थकणारही नाही, थांबणारही नाही, हा जुनाच व्हिडिओ व्हायरल!!