विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये जनतेने दिलेल्या आदेशा विरोधात सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या आणि “गोमूत्र राज्ये” म्हणून हिणवणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदाराविरुद्ध देशभरात संताप उसळला आहे. Only half of the mouths of those who insulted Sanatan were broken
सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांचे अर्धेच तोंड कालच्या निवडणुकीत जनतेने फोडले, पण आता मात्र जनता लवकरच त्यांचे पूर्ण तोंड फोडेल, अशा तिखट शब्दांमधून काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी विरुद्ध संताप उसळला आहे.
द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार सेंथिल कुमार यांनी लोकसभेत भाजपच्या विजयावर टिप्पणी करताना भाजप फक्त गोमूत्रवाल्या राज्यांमध्येच जिंकतो. दक्षिणेत तो येऊ शकत नाही. कारण तिथे आम्ही मजबूत आहोत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे देशभरात प्रचंड संताप उसळला असून तीन राज्यांमध्ये पराभव होऊन देखील अजून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष काही धडा शिकले नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
त्या पलीकडे जाऊन काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी काँग्रेस नेत्यांनाच परखड बोलायचं आहेत आत्ता फक्त गोमूत्र वाल्या राज्यांमध्येच भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. पण ते लोक सनातन धर्माचा धर्माचा असाच अपमान करत राहिले, तर लवकरच सांडवाल्या राज्यांमध्ये म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांमध्ये देखील भाजप झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही. सनातन धर्माचा अपमान कोणीही सहन करणार नाही, असे आचार्य प्रमोद कृष्णन म्हणाले. नव्या संसदेत गोमूत्र शिंपडण्याची भाषा झाली. त्यावर पंचगव्य तर आम्हाला प्रिय आहे, असे प्रत्युत्तर प्रमोद कृष्णन यांनी दिले.
सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांचे कालच्या निवडणुकीत जनतेने अर्धीच तोंड फोडले होते. आता लवकरच पूर्ण तोंड फोडेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी संताप व्यक्त केला. गाय, गंगा, गीता आणि गायत्री यांचा कुणी अपमान केला, तर भारतवासी ते सहन करणार नाहीत, असा इशाराही अश्विनी कुमार चौबे यांनी दिला. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सुशील कुमार मोदी यांनी देखील चौबे यांच्याच वक्तव्याला दुजोरा दिला.
मात्र, तामिळनाडूतील दुसरे खासदार MDMK चे वायको यांनी सेंथिल कुमार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.
Only half of the mouths of those who insulted Sanatan were broken
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…