• Download App
    गरीब देशांतील मुलांच्या कल्याणासाठी केवळ ५२ अब्ज डॉलर पुरेसे - कैलाश सत्यार्थी । Only Dollar 52 billion is enough for the welfare of children in poor countries - Kailash Satyarthi

    गरीब देशांतील मुलांच्या कल्याणासाठी केवळ ५२ अब्ज डॉलर पुरेसे – कैलाश सत्यार्थी

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अल्पउत्पन्न गटात असणाऱ्या देशांमधील बालके आणि प्रत्येक गर्भवती महिलेला सामाजिक सुरक्षा पुरविण्यासाठी ५२ अब्ज डॉलर पुरेसे आहेत. दोन हजारांहून अधिक अब्जाधीश असणाऱ्या या जगासाठी ही रक्कम फार मोठी नाही,’ असे स्पष्ट मत नोबेल विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी मांडले. Only Dollar 52 billion is enough for the welfare of children in poor countries – Kailash Satyarthi

    ते म्हणाले,‘‘गरीब देशांमधील बालकांना आणि गर्भवती महिलांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यासाठी ५२ अब्ज डॉलर पुरेसे आहेत. ही फार मोठी रक्कम नाही. कोरोना मदत कार्यासाठी दोन दिवसांसाठी जितका निधी आवश्यहक असतो, तेवढाच हा निधी आहे. तसेच श्रीमंत देशांमध्ये सामाजिक सुरक्षेसाठी जितका पैसा खर्च केला जातो, त्या तुलनेतही ही रक्कम केवळ ०.४ टक्के आहे. २,७५५ अब्जाधीश असलेले हे जग गरीब आहे, हे मानण्यास मी तयार नाही.



    जगात नवीन कल्पनांची अजिबात कमतरता नाही. मात्र, सर्वच क्षेत्रांमध्ये आता धाडसाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.’’ कोरोना संसर्गस्थितीमुळे जगभरातील अन्याय आणि असमानता उघडकीस आणली असल्याचे सत्यार्थी यांनी निदर्शनास आणून दिले. या असमानतेचा फटका दुर्लक्षित घटकांमधील बालकांना बसल्याचेही त्यांनी सांगितले.

    Only Dollar 52 billion is enough for the welfare of children in poor countries – Kailash Satyarthi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!