• Download App
    ऑनलाइन गेम जिहाद : PUBG खेळातून संगमनेरच्या मुलीच्या धर्मांतराचा प्रयत्न करणारा बिहारचा अक्रम शेख तब्बल 31 मुलींच्या संपर्कात!! |Online Game Jihad: Bihar's Akram Sheikh, who tried to convert Sangamner's daughter through PUBG game, contacted as many as 31 girls!!

    ऑनलाइन गेम जिहाद : PUBG खेळातून संगमनेरच्या मुलीच्या धर्मांतराचा प्रयत्न करणारा बिहारचा अक्रम शेख तब्बल 31 मुलींच्या संपर्कात!!

    प्रतिनिधी

    नगर : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता संगमनेरमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याच्या कारनाम्याची चौकशी सुरू आहे. आरोपी अक्रम शहाबुद्दीन शेख हा एक-दोन नव्हे तर तब्बल 31 मुलींच्या संपर्कात होता आणि त्याने अनेकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे pubg च्या माध्यमातून 31 मुलींचा धर्मांतर करण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्याने ऑनलाइन गेम द्वारे मुलींबरोबर ओळख करून घेतली त्यांच्याशी तो ऑनलाइन गेम खेळत राहिला ओळख वाढवत राहिला आणि त्याने या मुलींचे ब्रेनवॉश करून धर्मांतराचा प्रयत्न करून पाहिला. पण पोलिसांनी त्याला वेळीच अटक केली. या तपासातून त्याचे पाकिस्तान कनेक्शनही उघड झाले आहे.Online Game Jihad: Bihar’s Akram Sheikh, who tried to convert Sangamner’s daughter through PUBG game, contacted as many as 31 girls!!



    ऑनलाइन गेमद्वारे मुलांचे धर्मांतर करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या शाहनवाज खान उर्फ ​​बड्डो याला अटक केली. शाहनवाज खान हा या रॅकेटचा म्होरक्या आहे. अशातच आता तरुणाईला वेड लावणाऱ्या पबजी गेमच्या (PUBG) माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी एका अटक करुन पुढील तपास केला आणि त्यातूनच तो 31 मुलींच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

    अक्रम शाहाबुद्दिन शेख हा असे आरोपीचे नाव आहे. संगमनेर इथल्या एका 22 वर्षीय पीडित तरुणीशी पबजी बिजीएमआय गेमच्या माध्यमातून ओळख करवून घेतली होती. हा आरोपी मूळचा बिहारमधील अलीनगर जिल्हा दरभंगा येथील आहे. अक्रमसोबत त्याचा एक मित्र नेमितुल्ला हादेखील थेट बिहारहून संगमनेरात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला आहे.

    अक्रम शेखने पबजी गेमच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तरूणीला भेटण्यासाठी थेट संगमनेर गाठले होते. तरुणीसोबत गोड गोड बोलत आरोपी अक्रम तिला एका निवांत जागेत घेऊन गेला. काहीतरी चुकीचे घडत आहे हे पीडित तरुणीच्या लक्षात येताच ती घरी जाऊ लागली. त्यावेळी आरोपी अक्रम पीडित तरुणीसोबत बळजबरी करायला लागला आणि आपण बिहारला जाऊ लग्न करू असे सांगायला लागला. तरुणीने पळण्याचा प्रयत्न करताच तुझे व्हिडिओ बनवून मारून टाकू, अशी धमकी अक्रम आणि त्याच्या मित्राने दिली.

    त्यानंतर तरुणीने आपल्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अक्रमला ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये तो अनेक हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पब्जी गेम खेळण्याच्या माध्यमातून मुलींची मैत्री करून धर्मांतर करण्याचा हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. या मुलाने आतापर्यंत किती मुलींना फसविले याचा पोलिसांनी तपास केला. त्याचा मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तपासली त्यातून तो 31 मुलींच्या संपर्कात आल्याचे उघड झाले.

    Online Game Jihad: Bihar’s Akram Sheikh, who tried to convert Sangamner’s daughter through PUBG game, contacted as many as 31 girls!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य