विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chairman P. P. Chaudhary देशात ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) ही संकल्पना राबवली गेल्यास सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी केला आहे.Chairman P. P. Chaudhary
चौधरी म्हणाले की, सध्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.6 टक्के खर्च हा निवडणुकांवर होतो. प्रत्येक वेगवेगळ्या निवडणुकीसाठी लागणारा खर्च हा 5,000 कोटींपासून 15,000 कोटींपर्यंत पोहोचतो. जर लोकसभा आणि विधानसभांची निवडणूक एकत्र घेतली गेली, तर यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी वाचवला जाऊन तो देशाच्या पायाभूत सुविधा व विकास कामांसाठी वापरता येईल, असे ते म्हणाले.
मुंबई दौऱ्यात संयुक्त समितीने राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, बँका आणि विविध प्राधिकरणांशी चर्चा केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्याशीही समितीने संवाद साधला.
चौधरी यांनी सांगितले की, एकत्र निवडणुकीमुळे:
स्थिर सरकार पाच वर्षांसाठी मिळेल, त्यामुळे देशात गुंतवणूक वाढेल.
निवडणुका सुरू असताना बँकिंग व्यवहार, शालेय शिक्षण आणि सरकारी यंत्रणा अडचणीत येतात; एकत्र निवडणुकीमुळे या अडचणी टळतील.
शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि इतर यंत्रणा सतत निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे शिक्षण आणि प्रशासनावर विपरीत परिणाम होतो.
राजकीय पक्षांचे मत भिन्न असले तरी लोकशाहीसाठी लाभदायक ठरणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका प्रथम एकत्र घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील एकत्र घेण्याचा विचार सुरू केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘One Nation, One Election’ will save the country Rs 5,000 crores; Committee Chairman P. P. Chaudhary claims
महत्वाच्या बातम्या
- Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा दहशतवादी सैफुल्ला खालिदची हत्या!
- Solapur fire tragedy : सोलापूर आग दुर्घटना : पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पीडितांना आर्थिक सहाय्य
- Hyderabad हैदराबादमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उधळला, आयसिसशी संबंधित दोन जणांना अटक
- YouTuber Priyanka Senapati : ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात ओडिशातील यूट्यूबर प्रियांका सेनापती संशयाच्या भोवऱ्यात