• Download App
    ‘’पंतप्रधान मोदींना कुणी पसंत किंवा नापसंत करू शकतो, परंतु...’’; गुजरात उच्च न्यायालयाची टिप्पणी! One might like or dislike PM Narendra Modi but should not use derogatory language against him Gujarat High Court

    ‘’पंतप्रधान मोदींना कुणी पसंत किंवा नापसंत करू शकतो, परंतु…’’; गुजरात उच्च न्यायालयाची टिप्पणी!

    जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे न्यायालयाने आणि काय आहे प्रकरण?

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांच्याबाबत अपमानस्पद पोस्ट करणाऱ्या आरोपी व्यक्तीस जामीन फेटाळला आहे. एकल न्यायाधीश निर्जर देसाई यांनी म्हटले की, पंतप्रधानांना पसंत अथवा नापसंत करण्यासाठी कुणीही स्वतंत्र आहे, परंतु कोणीही त्यांच्याबद्दल अपमानजक भाषेचा वापर करू नये. One might like or dislike PM Narendra Modi but should not use derogatory language against him Gujarat High Court

    न्यायाधीश म्हणाले, हे समजले जाऊ शकते की एखाद्याला एखादी व्यक्ती आवडू अथवा न आवडू शकते. परंतु याचा अर्थ असा नाही की एखादा व्यक्ती पंतप्रधान आणि त्यांच्या दिवंगत आईबद्दल अपामानस्पद भाषा वापरणं सुरू करेल. म्हणूनच या न्यायालयाकडून सामान्य टिप्पणी केली जाते.

    न्यायलयाने म्हटले की आरोपी अफसलभाई कसमभाई लखानीद्वारे केल्या गेलेल्या पोस्टमध्ये केवळ पंतप्रधानांविरोधातच नाही तर त्यांच्या दिवंगत आईबद्दलही अपमानास्पद टिप्पणी होती. हा व्यक्ती आपले पेज ‘’गुजरात त्रस्त भाजपा मस्त’’ यावर अश्लील मजकूर वापरत होता. याशिवाय न्यायालयाने हेही दर्शवले की आरोपीनी भारत विरोधी आणि पाकिस्तानचे समर्थन करणार मजकूरही पोस्ट केलेला आहे. न्यायालयाने म्हटले की, या आरोपीनी सामाजिक सलोखा बिघेडल अशाप्रकारच्या पोस्टही केलेल्या आहेत.

    याचबरोबर पंतप्रधानांबाबत वापरलेली भाषा एवढी अपमानजनक होती की, तिचा पुन्हा उल्लेख करणेही शक्य नाही. आरोपीविरोधात ३१ डिसेंबर २०२२ रोजी देवुभाई गढवी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने म्हटले की जर अशा व्यक्तीला जामीन दिला गेला, तर हे नक्कीच आहे की तो पुन्हा एकदा वेगळ्या नावाने पेज तयार करून अशाच प्रकारचा पुन्हा गुन्हा करेल. असं म्हणत  न्यायालायने त्याचा जामीन फेटाळला.

    One might like or dislike PM Narendra Modi but should not use derogatory language against him Gujarat High Court

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत