विशेष प्रतिनिधी
नागपूर : जम्मू काश्मीर मधून 370 कलम आठविण्याच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या शिक्का मोर्तबानंतर ठाकरे शिंदे यांची एक भाषा POK ताब्यात घ्या!!, असे आज घडले.One language of Thackeray Shinde after Supreme Court seal; Take over POK!!
सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविण्याच्या निर्णयावर घटनात्मक शिक्कामोर्तब केले. त्यानंतर देशातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काँग्रेस आणि जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षांनी निराशा जाहीर केली, तर बहुसंख्य राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या प्रकारे पण सर्वसाधारणपणे एकाच भाषेत प्रतिक्रिया आली, ती पाकव्याप्त काश्मीर अर्थात POK विषय होती. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी वेगवेगळ्या प्रकारे एकच मागणी केली, ती म्हणजे POK ताब्यात घ्या ही होय!!
अर्थात दोघांच्याही भाषेत थोडा फरक होता, तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरमध्ये आता मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होईल आणि POK ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेलाही वेग येईल, असा आशावाद व्यक्त केला, तर उद्धव ठाकरेंनी आता लवकरात लवकर POK ताब्यात घेऊन दाखवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले.
पण मूळात दोन्ही नेत्यांची राजकीय पाळेमुळे शिवसेनेतच रुजली असल्याचा यातून प्रत्यय आला. कारण POK ताब्यात घेण्याची अत्यंत आक्रमक भाषा बाळासाहेब ठाकरे नेहमी वापरत असत. शिवसेनेतल्या फुटी नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांविरुद्ध उभे राहिले असले तरी POK बाबत शिवसेनेची मूळ भूमिका बदललेली नाही हेच दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
One language of Thackeray Shinde after Supreme Court seal; Take over POK!!
महत्वाच्या बातम्या
- गाझा पट्टीमध्ये तीव्र अन्न टंचाई, निम्मी लोकसंख्या उपासमारीने मरत आहे – संयुक्त राष्ट्रांचा इशारा
- बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी!
- मायावती यांनी पुतण्या आकाश आनंदला बनवले आपला राजकीय उत्तराधिकारी!
- “ही तर भ्रष्टाचाराची महाआघाडी” गिरीराज सिंह यांनी विरोधकांवर निशाणा!