शिरूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
विशेष प्रतिनिधी
शिरूर : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. मी एकदिवस पंतप्रधान होऊन शिरुरला हेलिकॉप्टरमधून येईन, असा विश्वास जानकरांनी शिरूर येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात केला आहे. रासपचे शिरूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते, याप्रसंगी मोठ्यासंख्येने कार्यककर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. One day I will become Prime Minister and come to Shirur by helicopter Statement of President Mahadev Jankar
याप्रसंगी जानकर म्हणाले, आपल्या मुलांनी खासदार, आमदार व्हायला हवं. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस, जिल्हाधिकारी, एसपी, वरिष्ठ अधिकारी व्हायला हवं. मंत्री म्हणून काम करताना, जनतेच्या हितासाठी धोरणं राबवताना मंत्रालयातील अधिकारी मोठी अडचण निर्माण करतात.
आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, तरच सर्वसामान्य जनता असो किंवा शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याची भूमिका घेता येईल. महाराष्ट्रातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांची दिल्लीत सर्व व्यवस्था करणार असल्याचे म्हणत, आपणही पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून, याच शिरूरला लवकरच हॅलिकॉप्टरमधून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
One day I will become Prime Minister and come to Shirur by helicopter Statement of Mahadev Jankar
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेपेक्षा जास्त भेदक क्षेपणास्त्राची इराणकडून निर्मिती, 2,000 किमी पल्ला, अमेरिका-इस्रायलपर्यंत पोहोचण्यास सक्षम
- पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरी धर्मांतर, तिथल्या कोर्टाने पीडितेला त्याच गुंडांच्या ताब्यात दिले; 12 वर्षांत 14000 धर्मांतर प्रकरणे
- सुप्रीम कोर्टात आज नव्या संसदेच्या उद्घाटनावर सुनावणी, राष्ट्रपतींकडून उद्घाटन व्हावे यासाठी याचिका दाखल
- कर्नाटकात उद्या 24 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ, सिद्धरामय्या आज राहुल गांधींची भेट घेणार