वृत्तसंस्था
ऋषिकेश : हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात गर्दीवर नियंत्रित करणे अतिशय कठीण काम आहे. पण, यंदा विशेष पोलीस अधिकारी बनलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यानी हे आव्हान पेलेले असून गर्दी आटोक्यात आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. One and a half thousand of Rashtriya Swayamsevak Sangh Volunteers contribute to Kumbh Mela
विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी बिरेंद्र प्रसाद दारबाल यांनी स्वयंसेवकाच्या कार्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्यासाठी स्वंयसेवकांना प्रथमच विशेष पोलीस अधिकारी अशी ओळखपत्र दिली होती. त्यांनी वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे.
स्नानानंतर परतणाऱ्या भाविकांना संघाचे स्वयंसेवक त्यांच्या वेशभूषेत सर्व माहिती देत होते. तसेच लागेल ती मदतही करत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घाला, सामाजिक अंतर ठेवा, अशा सूचना देत होते.
आशिष चौधरी आणि तरुण शर्मा हे अवघ्या 20 वर्षाचे स्वयंसेवक 7 एप्रिलपासून दोन शिफ्टमध्ये सुमारे 12 तास कुंभमेळ्यात कार्य करत आहेत. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत ते काम करतात. केंद्रीय दले आणि पोलिसांना गर्दी व्यवस्थापन आणि वाहन नियंत्रित करण्यास ते मदत करत आहेत. त्यांच्यासारखे 1 हजार 553 संघाचे स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहेत.
One and a half thousand of Rashtriya Swayamsevak Sangh Volunteers contribute to Kumbh Mela
इतर बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या उर्वरित ४ टप्प्यांमध्ये बदल नाही; निवडणूक आयोगाचा खुलासा; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा
- पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर ; 20 एप्रिलनंतर बाजारात ?
- पश्चिम बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा