काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर थरूर यांनी गुरुवारी म्हटले की, ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे एका प्रश्नावर चर्चा करत होते.On the video that went viral with Supriya Sule in Parliament, Shashi Tharoor Gave Interesting Reply
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर थरूर यांनी गुरुवारी म्हटले की, ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे एका प्रश्नावर चर्चा करत होते.
हा व्हिडिओ मंगळवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचा आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसून सुप्रिया सुळे आणि शशी थरूर आपसांत बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कॉमेंट करत आहेत.
यानंतर थरूर यांनी आता ट्विट केले आहे आणि म्हटले आहे की, “जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संक्षिप्त संभाषणाचा आनंद घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या मला धोरणाशी संबंधित प्रश्न विचारत होत्या, कारण त्या पुढील प्रश्न करणार होत्या. फारुख साहेबांना (त्या वेळचे वक्ते) त्रास होऊ नये म्हणून त्या (सुप्रिया) हळूच बोलत होत्या. मी त्यांचे बोलणे ऐकू येण्यासाठी वाकलो होतो.”
यानंतर थरूर यांनी अमर प्रेम चित्रपटातील गाण्याचा संदर्भ देत ट्विट केले. त्यांनी लिहिले, ”कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना! कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई. तू कौन है, तेरा नाम है क्या, सीता भी यहां बदनाम हुई. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना!” तथापि, हे सुप्रसिद्ध गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले असून किशोर कुमार यांनी गायिले आहे.
On the video that went viral with Supriya Sule in Parliament, Shashi Tharoor Gave Interesting Reply
महत्त्वाच्या बातम्या
- काळा पैसा मिळवायचा, कारवाई झाली की बोंबलायचं आणि पाप झाकण्यासाठी शक्तीप्रदर्शन करायचे, नारायण राणे यांची संजय राऊतांवर टीका
- कॉँग्रेसचा डाव शिवसेना उधळणार, कोल्हापूर उत्तरमध्ये दुसरे मंगळवेढा घडणार!
- संरक्षणात आत्मनिर्भरता, हेलिकॉप्टरपासून तोफखान्यासह १०५ शस्त्रात्रे भारतातच बनणार, शत्रुराष्ट्र सुरक्षा यंत्रणेत घुसखोरी