• Download App
    प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही अटक करावी अशी कुणाची लायकी नाही|On the question of Priyanka Gandhi's arrest, Yogi Adityanath said, "No one deserves to be arrested."

    प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही अटक करावी अशी कुणाची लायकी नाही

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या: आम्ही कोणालाही अटक केली नाही आणि आम्ही अटक करावी इतकी कुणाची लायकी नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. जनतेच्या न्यायालयातच निर्णय होऊन आगामी निवडणुकीत लखीमपूरमधील सर्व जागा भाजपाच जिंकेलअ सा विश्वास त्यांनी त्यांनी व्यक्त केला.On the question of Priyanka Gandhi’s arrest, Yogi Adityanath said, “No one deserves to be arrested.”

    अयोध्येत आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, लखीमपूरमधील घटना चुकीच्याच होत्या. त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्याचा अहवाल येऊ द्या. मग, मंत्रीही जातील आणि लोकही जातील पण, जनतेच्या न्यायालयात अशा लोकांचा खरा चेहरा समोर आलाच पाहिजे.



    लखीमपूर प्रकरणातील संपूर्ण कारवाई पारदर्शक आहे. यात कोणालाही बोट दाखविण्यासाठी सरकार जागाच ठेवणार नाही. उत्तरप्रदेशातील कायदा सुव्यवस्था किती स्वच्छ आणि पारदर्शक आहे, याचा लोकांना नव्याने प्रत्यय येईल.

    लखीमपूर येथे भाजपाचे केंद्रीय गृह राज्य मंत्री आशिष मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या जमावावर गाडी घातल्याचा आरोप आहे. यामध्ये चार शेतकºयांचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतकºयांच्या जमावाने चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी मिश्रा यांच्या मुलाला अटक केली आहे. याबाबत चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे.

    On the question of Priyanka Gandhi’s arrest, Yogi Adityanath said, “No one deserves to be arrested.”

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    IMF Loan : IMF ने पाकिस्तानला ₹11,000 कोटींचे कर्ज दिले; जगभरातील वाईट परिस्थितीतही अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचा दावा

    NIA Finds : दिल्लीतील बॉम्बस्फोटापूर्वी काश्मिरी जंगलात चाचणी; ‘एनआयए’कडे पुरावे, कटाच्या मुळापर्यंत पोहोचणार

    Lok Sabha : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा, मतचोरीवर वादंग; राहुल गांधींना दुबेंचे उत्तर- पदांचे बक्षीस तर काँग्रेस देत होती