• Download App
    पन्नू प्रकरणावर PM मोदी म्हणाले- काही घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधावर परिणाम होऊ शकत नाही, चौकशी करणार|On the Pannu issue, PM Modi said - India-US relations cannot be affected due to some incidents, will investigate

    पन्नू प्रकरणावर PM मोदी म्हणाले- काही घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधावर परिणाम होऊ शकत नाही, चौकशी करणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विधान केले आहे. फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले- काही घटनांमुळे अमेरिका-भारत संबंध बिघडवू शकत नाही.On the Pannu issue, PM Modi said – India-US relations cannot be affected due to some incidents, will investigate

    आपल्या देशातील कोणत्याही नागरिकाने दुसऱ्या देशात चांगले किंवा वाईट काम केल्यास त्याची जबाबदारी आपण घेतो. आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही चौकशी करण्यास तयार आहोत. आम्ही कायद्याचे पालन करतो.



    पन्नू याच्यावर न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप अमेरिकन सरकारने केला होता. या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. हा कट उधळून लावला. मात्र, हा हल्ला कोणत्या दिवशी होणार होता, याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

    जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीनंतरच अमेरिकन अधिकाऱ्यांनी हा मुद्दा भारतासमोर मांडला होता. 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या फायनान्शियल टाइम्सच्या अहवालात हे उघड झाले आहे.

    काही घटनांना राजनैतिक संबंधांशी जोडता कामा नये

    मोदी म्हणाले- अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे घटक धमकावण्यात आणि हिंसाचार भडकावण्यात गुंतलेले आहेत. परदेशातील काही अतिरेकी गटांच्या कारवायांची भारताला चिंता आहे. अमेरिकेशी आमचे संबंध अतिशय मजबूत आहेत. सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य करणे, हा आमच्या भागीदारीचा आधारस्तंभ राहिलेला आहे. मात्र, काही घटनांचा संबंध दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांशी जोडता कामा नये.

    भारतवंशीय खासदार म्हणाले होते – पन्नू प्रकरणामुळे दोन्ही देशांचे संबंध धोक्यात येऊ शकतात

    16 डिसेंबर 2023 रोजी भारतीय वंशाचे पाच खासदार एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती आणि श्री ठाणेदार यांनी म्हटले होते की, पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तपास न झाल्यास भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडू शकतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. असे पुन्हा कधीही होणार नाही, याची भारताने काळजी घेतली पाहिजे. भारताने अमेरिकेच्या भूमीवर असे षड्यंत्र पुन्हा करू नये आणि तपासात पूर्ण सहकार्य करावे.

    On the Pannu issue, PM Modi said – India-US relations cannot be affected due to some incidents, will investigate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य