प्रतिनिधी
रायबरेली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे स्वतःच्याच बोलात नीट बोल दिसत नाहीत!! एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर तोफा ङागताना त्या म्हणाल्या, गॅस कनेक्शन देणे, शौचालये बांधणे म्हणजे महिला सशक्तीकरण नाही, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात काँग्रेस सत्तेवर आली तर महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणाही त्यांनी ट्विटर द्वारे केली आहे. On the one hand, Priyanka Gandhi says, gas connection, toilets are not women empowerment
त्यामुळे प्रियंका गांधी यांना नेमके काय सुचवायचे आहे? आणि म्हणायचे आहे? त्यांच्या मनात नेमका कसला संभ्रम आहे?, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. “लडकी हूॅ लड सकती हू!!” या महिला शक्तीसंवाद मेळाव्यात रायबरेलीमध्ये प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले.
नुसती शौचालये बांधून दिली आणि गॅस कनेक्शन दिले म्हणजे महिला सशक्तीकरण झाले असे मोदी सरकार मानत असेल तर ते चूक आहे. महिलांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांनी मुक्तपणे मतदान केले पाहिजे, असे भाषण प्रियांका गांधी यांनी केले.
पण त्याच वेळी उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसचे सरकार आले तर महिलांसाठी आपण काय करू, याच्या एकाचढ एक वेगवेगळ्या घोषणा प्रियांका गांधींनी आपल्या ट्विटर हँडलवर केल्या आहेत. यामध्ये महिलांना तीन भरलेले सिलेंडर मोफत देण्याची महत्त्वाची घोषणा आहे.
म्हणजे एकीकडे गॅस कनेक्शन देणे हे महिला स-मशक्तिकरण नाही असे प्रियांका गांधी जाहीर भाषणात म्हणतात, तर दुसरीकडे आपल्या ट्विटर हँडलवर तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणाही करतात. यातली विसंगती काही माध्यमांनी टिपली आहे.