दरम्यान’ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन मिळत असल्याने भाविकांना नोंदणी सक्तीची आहेOn the occasion of New Year, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant took darshan of Shri Mahalakshmi Devi
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : काल (१ जानेवारी ) गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.
तसेच डॉ. सावंत यांनी नंतर श्री जोतिबा देव आणि नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शनही घेतले.या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
१ जानेवारीला नवीन वर्ष आणि २ जानेवारीला रविवार अशा आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान’ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शन मिळत असल्याने भाविकांना नोंदणी सक्तीची आहे.तसेच दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह आढळून आला.
On the occasion of New Year, Goa Chief Minister Dr. Pramod Sawant took darshan of Shri Mahalakshmi Devi
महत्त्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली
- सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली