विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून चाकू हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुंबईतल्या कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता व्यक्त केली. बीड मधील घटनांवरून त्यांनी आधीच कायदा सुव्यवस्थेची चिंता व्यक्त केली होतीच, ती त्यांनी मुंबईतल्या घटनेनंतर रिपीट केली. पण या पार्श्वभूमीवर सैफ अली खान सारख्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहणाऱ्या अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर घरात पोहोचलाच कसा??, असा सवाल यानिमित्ताने समोर आला.
सैफ अली हा “खान” आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले म्हणूनच हल्ला झाल्याचा “जावईशोध” पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावला, तर बॉलीवूड मधले अभिनेते रजा मुराद यांनी यासंदर्भात काही वेगळीच शंका व्यक्त केली. सैफ अली खान मुंबई ज्या सोसायटीत राहतो, त्या सोसायटीची सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. तिथे सुरक्षा व्यवस्थेचे तीन-चार लेअर्स आहेत. एन्ट्री पॉइंटलाच सगळ्या सिक्युरिटी चेक्स झाल्याशिवाय तुम्हाला आत प्रवेशच मिळत नाही. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचबरोबर सैफ अली खान याची स्वतःची सुरक्षा व्यवस्था तिथे मौजूद आहे. अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या ठिकाणी कुठलाही हल्लेखोर सैफ अली खान जवळ पोहोचलाच कसा??, याविषयी दाट संशय आहे, असे रजा मुराद यांनी सांगितले.
यासंदर्भात सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून सैफच्या अन्य तीन नोकरांना देखील चौकशी आणि तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सैफ अली खान याच्या स्पायनल कॉर्डला धक्का पोहोचला असून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. सैफ अली खानच्या कुटुंबीयांनी या संदर्भात सविस्तर माहिती देणारे पत्रक जारी केले आहे.
On the attack on actor Saif Ali Khan, actor Raza Murad says
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप
- Delhi : दिल्लीतील ४०० शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
- Sanjay Raut : संजय राऊतांना अचानक झाली भाजपची आठवण अन् काँग्रेसला दिलेला सल्ला
- PM Modi : IMDच्या १५० व्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींनी सुरू केले ‘मिशन मौसम’