विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या दुसऱ्या टर्म मध्ये सुरू केलेली अग्निवीर योजना कोणत्याही स्थितीत काँग्रेसला मान्यच नाही. अग्निवीर योजनेतली कुठलीही सुधारणा मान्य करायचीच नाही, असा हट्ट काँग्रेस धरून बसली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये अग्निवीर योजनेत कोणतेही बदल केले, त्यामध्ये सुधारणा केल्या, अग्निवीर योजनेतील सैनिकांना सर्व प्रकारचे विशिष्ट कायदेशीर अधिकार आणि सवलती दिल्या, तरी संपूर्ण योजनाच हाणून पाडायच्या बेतात काँग्रेस आली आहे. On the Agniveer scheme, Congress MP Deepender Singh Hooda say
काँग्रेसचे खासदार दिपेंद्र हुडा यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ही बाब समोर आली. मोदी सरकार अग्निवीर योजनेतील काही त्रुटी दूर करून अग्निवीर सैनिकांना काही विशिष्ट सवलती बहाल करण्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. अग्निवीर सैनिकाची मुदत 4 वर्षांवरून वाढवून 7 वर्षांपर्यंत करणे, त्याला विशिष्ट पेन्शन योजनेचा लाभ देणे, त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातील विविध दलांमध्ये, तसेच राज्याच्या पोलिस दलांमध्ये अग्निवीर सैनिकाला मूळ सेवेनंतर सामावून घेणे, वगैरे सुधारणा मोदी सरकार करण्याची शक्यता आहे.
मात्र मूळातच अग्निवीर योजना देशाच्या हिताची नाही, असा दावा करून खासदार दिपेंद्र हुडा यांनी अग्नी विहीर योजना काँग्रेस हाणून पाडेल असे स्पष्ट केले.
अग्निवीर योजना सैन्यातील कुशल मनुष्यबळ वाढवणे सीमेवरती सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, त्याचबरोबर देशातल्या युवकांना एक सक्षम रोजगार देणे, तसेच देशातल्या विविध संवेदनशील राज्यांमधल्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी त्यांचे कौशल्य विकसित करणे, या हेतूने तयार करण्यात आली. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील झाली.
मात्र अग्निवीर योजनेद्वारे मोदी सरकार हिंदूंची सैन्य भरती करते, असा आरोप करून काँग्रेसचे नेते पहिल्यापासूनच अग्निवीर योजनेच्या ठाम विरोधात गेले. 2019 ते 2024 या काळात काँग्रेसची संसदीय पक्षाची अवस्था बिकट होती. काँग्रेसला लोकसभेमध्ये फक्त 54 खासदारांच्या आधारे मोदी सरकारशी लढावे लागत होते. मात्र आता काँग्रेसची सदस्य संख्या 99 झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बळ संचारले आहे आणि या बळातूनच काँग्रेसने अग्निवीर योजना हाणून पाडण्यासाठी कंबर कसली आहे. आता मोदी सरकार अग्निवीर योजनेमध्ये नेमक्या कोणत्या सुधारणा करते आणि त्या सुधारणांची अंमलबजावणी केव्हा सुरू करते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
On the Agniveer scheme, Congress MP Deepender Singh Hooda say
महत्वाच्या बातम्या
- टीकेची झोड उठली तरी अजितदादांना सोडवेना सत्तेची वळचण; पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांची पाठराखण!!
- POCSO प्रकरणात येडियुरप्पा यांच्या अटकेला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली स्थगिती!
- रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
- काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय वर UAPA अंतर्गत खटला चालणार!!