• Download App
    रविवारी उत्तर प्रदेशमध्ये झिका विषाणूचे नवीन 10 पेशंट आढळून आले | On Sunday, 10 new patients with Zika virus were found in Uttar Pradesh

    रविवारी उत्तर प्रदेशमध्ये झिका विषाणूचे नवीन 10 पेशंट आढळून आले

    विशेष प्रतिनिधी

    उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश मध्ये रविवारी झीका वायरसमुळे संक्रमित झालेल्या पेशंटची संख्या 10 झाली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार संक्रमित झालेल्या लोकांची एकूण संख्या 89 इतकी झाली आहे.

    On Sunday, 10 new patients with Zika virus were found in Uttar Pradesh

    झीका वायरसने संक्रमित झालेल्या पेशंटची संख्या शनिवारी 13 होती. कानपूरमध्ये झिका विषाणूची प्रकरणे वाढत असल्याने, संपूर्ण शहरातील सरकारी रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संसर्गजन्य रोग नियंत्रण मोहिमेअंतर्गत कडक नियम देखील लागू केले जात आहेत.

    झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य अधिकाऱ्यांनीही विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. “व्हायरस-संक्रमित लोकांच्या उपचारासाठी सर्व रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात आहे. पाळत ठेवणे सुधारले आहे,” अधिकाऱ्यांनी सांगितले.


    पुणे : पुण्याला Zika Virus चा धोका? जिल्हाधिकाऱ्यांनी ७९ गावं ठरवली संवेदनशील ; आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश


    दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अधिकाऱ्यांना sanitization कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    कानपूरमध्ये 23 ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या (IAF) वॉरंट अधिकाऱ्याची झिका व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली होती.

    झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे. जो दिवसा चावणाऱ्या एडिस प्रजातीच्या संक्रमित डासांव्दारे पसरतो. या आजाराची लक्षणे म्हणजे सौम्य ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी ही आहेत.

    On Sunday, 10 new patients with Zika virus were found in Uttar Pradesh

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!