Sunday, 4 May 2025
  • Download App
    राहुल गांधी वायनाड मधून कशासाठी लढताहेत, हिंमत असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशातून लढावे; कम्युनिस्ट नेत्यांचे आव्हान!! On Kerala CM Pinarayi Vijayan's statement regarding the candidature of Rahul Gandhi from Wayanad

    राहुल गांधी वायनाड मधून कशासाठी लढताहेत, हिंमत असेल तर त्यांनी उत्तर प्रदेशातून लढावे; कम्युनिस्ट नेत्यांचे आव्हान!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राहुल गांधी खरंच भाजपला आव्हान देण्याच्या मन:स्थितीत आहेत का??, असे असेल, तर ते केरळ मधल्या वायनाड मधून कशासाठी लढत आहेत??, कारण तिथे भाजपशी त्यांची लढाईच नाही. हिंमत असेल, तर त्यांनी भाजप विरोधात उत्तर प्रदेशातून लढावे, अशा शब्दांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी आज राहुल गांधींना आव्हान दिले. त्यामुळे “इंडिया” आघाडीत राहुल गांधींच्याच उमेदवारीवरून फूट पडल्याचे उघड्यावर आले. On Kerala CM Pinarayi Vijayan’s statement regarding the candidature of Rahul Gandhi from Wayanad

    राहुल गांधींनी केरळ मधल्या वायनाड मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर करताच कम्युनिस्ट पार्टीचे नेते आधीच खवळले आहेत. परवा दिवशीच केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पिनराई विजयन यांनी राहुल गांधींचे वाभाडे काढले होते. देशभरामध्ये मोदी सरकार विरोधात एवढी मोठी आंदोलने झाली, तिथल्या प्रत्येक आंदोलनामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या वायनाड मधल्या उमेदवार एनी राजा या आघाडीवर होत्या, पण त्यावेळी राहुल गांधी कुठे होते??, असा सवाल पिनराई विजयन यांनी केला होता.

    त्यांच्या पाठोपाठ आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी देखील राहुल गांधींवर ठळक प्रश्नचिन्ह लावले. राहुल गांधी खरंच भाजप विरोधात लढत असतील, तर ते केरळ मधून लोकसभा निवडणूक का लढवत आहेत?? त्यांनी भाजपचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी. तिथे भाजपचा पराभव करून दाखवावा, तर लोक त्यांचे नेतृत्व स्वीकारतील केरळ मधल्या वायनाड मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवून राहुल गांधी जनतेला नेमका कोणता संदेश देऊ इच्छित आहेत??, असा खोचक सवाल सुभाषिनी अली यांनी केला.

    राहुल गांधी आणि सगळे कम्युनिस्ट पक्ष “इंडिया” आघाडीच्या व्यासपीठावर एकत्र दिसतात, पण प्रत्यक्षात केरळच्या लोकसभेच्या मैदानात ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत आणि त्यामुळेच कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी राहुल गांधींवर थेट तोफा डागल्या आहेत.

    On Kerala CM Pinarayi Vijayan’s statement regarding the candidature of Rahul Gandhi from Wayanad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!