विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिरवी धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडा होणाऱ्या काँग्रेसने अखेर आपले खायचे दात बाहेर काढलेच. Waqf बोर्ड कायदा सुधारण्याचा विषय हा मुस्लिमांसाठी धार्मिक विषय आहे. तो भारतीय संसदेच्या कक्षेच्या बाहेरचा मुद्दा आहे, अशी मुक्ताफळे काँग्रेस नेत्याने उधळली आहेत. Waqf Board
एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी सनातन हिंदू धार्मिक बोर्ड अधिनियम लागू करायला विरोध केला आहे, तर दुसरीकडे त्याच पक्षाच्या नेत्यांनी वक्फ बोर्ड हा मुस्लिमांचा धार्मिक विषय असल्याचे वक्तव्य करून धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर पक्षाला उघडे पाडले आहे.
काँग्रेसचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष सज्जाद गणी लोन यांनी वक्त बोर्ड सुधारणा हा विषय मुस्लिमांसाठी धार्मिक असल्याचा दावा केला. वक्फ मध्ये सुधारणा करायची नाही की नाही हे मुस्लिम धार्मिक नेते बघून घेतील. तो मूळातच भारतीय संसदीय कक्षेच्या बाहेरचा विषय आहे. त्यामुळे संसदेने त्यामध्ये लक्ष घालू नये, अशी मुक्ताफळे सज्जाद गणी लोन यांनी उधळली. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सज्जाद गणी लोन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे. मोदी सरकारने वक्फ मध्ये काही हस्तक्षेप केला, तर तो स्वीकारता येणार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले.
पण त्यापूर्वी काँग्रेसचेच प्रवक्ते माजी खासदार उदित राज यांनी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम भारतात लागू करायला विरोध दर्शविला. प्रयागराज मध्ये भरविलेल्या सनातन हिंदू धर्म संसदेने सनातन हिंदू बोर्ड अधिनियम लागू करण्याची केलेली मागणी घटनाबाह्य आहे. कारण ते मनुस्मृतीला मानतात. मनुस्मृती घटनाबाह्य आणि विरोधी आहे. त्यामुळे सनातन हिंदू बोर्ड अधिनियम लागू करणे शक्य नाही, असा दावा उदित राज यांनी केला.
अशाप्रकारे काँग्रेसच्याच दोन नेत्यांनी मुस्लिमांसाठी वेगळा न्याय आणि हिंदूंसाठी वेगळा न्याय अशी एकाच दिवशी भूमिका घेऊन पक्षाचे खायचे खरे दात दाखवले. त्यामुळे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला.
On JPC for Waqf Board meeting, and the implementation of UCC in Uttarakhand
महत्वाच्या बातम्या
- Devkinandan Thakur वक्फ बोर्ड लागू असेल, तर सनातन हिंदू बोर्ड अधिनियमन आणा; प्रयागराज महाकुंभातील सनातन धर्म संसदेत ठराव मंजूर!!
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी म्हणाला..
- Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
- Pratap Sarnaik :