वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन भारतात लोकशाही नसण्याची भाषणे करणाऱ्या राहुल गांधी आणि बाकीच्या भारतातल्या विरोधकांना लोकशाही पाहायची असेल तर दिल्लीत जाऊन पाहा!! अशा परखड शब्दांमध्ये व्हाईट हाऊसने सुनावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 जून रोजी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत या पार्श्वभूमीवर अमेरिकन अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात भारतातल्या लोकशाही वर सकारात्मक भाष्य केले आहे. On ‘health of democracy’ under Modi, US says ‘go to Delhi and see for yourself’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात निश्चितपणे लोकशाही जिवंत आहे. त्याची अनेक उदाहरणे भारतात मिळतील. लोकशाहीमध्ये चर्चा ही जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. भारतात अशा पद्धतीची चर्चा मोदी राजवटीतही सुरू आहे. हे लोकशाहीच्या आरोग्याचेच लक्षण आहे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी देखील भारतातल्या लोकशाही संस्थांवर सकारात्मक भाष्य केले. भारतात लोकशाहीचे आरोग्य उत्तम आहे. तिथे नेहमीच परस्परविरोधी चर्चा घडतात. त्याचे पडसाद उमटतात. त्यामुळे भारतात लोकशाही नसण्याच्या तक्रारी करण्यात काही अर्थ नाही. लोकशाही पाहायची असेल तर तुम्ही दिल्लीत जाऊन पाहा, असे जॉन किर्बी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांना सुनावले.
राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये जाऊन आणि सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर भारतात लोकशाही नाही. लोकशाही संस्थांचा गळा घोटला जात आहे, अशा आशयाची भाषणे केली. भारतात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या केसेस सुरू आहेत. त्यांच्यावर ईडी, सीबीआयचे छापे पडत आहेत. त्यामुळे विरोधक भारतात लोकशाही नसल्याचा धोशा लावतात.
या पार्श्वभूमीवर अमेरिकन अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसनेच भारतातल्या लोकशाहीचा निर्वाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची तयारी चालवली आहे आणि त्या संदर्भातच निवेदन जारी करताना भारतात लोकशाही जिवंत आहे आणि तिचे आरोग्य उत्तम आहे, अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे.
On ‘health of democracy’ under Modi, US says ‘go to Delhi and see for yourself’
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा