jp nadda : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पक्षाने कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेदरम्यान देशात 6.88 लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी सांगितले की, या स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले असून जर देशात कोरोनाची तिसरी लाट आली, तर ते आरोग्य यंत्रणेला मदत करतील. On coronavirus third wave jp nadda says we have trained 6.88 lakh volunteers in 2 lakh villages
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पक्षाने कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेदरम्यान देशात 6.88 लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी सांगितले की, या स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले असून जर देशात कोरोनाची तिसरी लाट आली, तर ते आरोग्य यंत्रणेला मदत करतील.
जे.पी. नड्डा म्हणाले, “जुलैमध्ये, आम्ही तिसरी लाट आल्यास आरोग्य सेवा यंत्रणेला मदत करण्यासाठी 2 लाख गावांमध्ये 4 लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याचे वचन दिले होते. 43 दिवसांत आम्ही 6.88 लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले आणि आशा आहे की आम्ही लवकरच 8 लाखांचा आकडा गाठू.
पीएम मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून देशभरात उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी, भाजप कार्यकर्ते कोविड -19 लसीसाठी अधिकाधिक लोकांना प्रेरित करण्यासाठी देशभरात एक विशेष मोहीम राबवतील. जेणेकरून एका दिवसात लसीकरणाचे सर्व जुने रेकॉर्ड मागे राहतील. आपल्या निवासस्थानी या मोहिमेची घोषणा करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी देशभरातील बूथ स्तरावरील कार्यकर्ते लोकांना लसीकरणात मदत करतील.
यावेळी भाजपा सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, पंतप्रधानांच्या वाढदिवशी लसीकरणाचे सर्व रेकॉर्ड मोडतील. चुग पुढे म्हणाले की, कोविड -19 महामारीच्या भविष्यातील लाटेचा सामना करण्यासाठी 18,000 डॉक्टर भाजपच्या स्वयंसेवक अभियानाशी संबंधित आहेत.
ते म्हणाले की, भाजप ऑक्टोबर महिन्यात आरोग्य स्वयंसेवकांसाठी एक विशेष अभ्यासक्रम राबवणार आहे. भाजप पंतप्रधानांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहे.
On coronavirus third wave jp nadda says we have trained 6.88 lakh volunteers in 2 lakh villages
महत्त्वाच्या बातम्या
- Afghanistan Crisis : अफगाणी लढवय्या नेता अमरुल्लाह सालेह यांच्या मोठ्या भावाची हत्या, तालिबान्यांनी छळ करून ठार मारले
- राज्यसभेतील गोंधळ : खर्गे म्हणाले – आता प्रकरण मिटले आहे, त्यामुळे चौकशी समितीची गरज नाही
- देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायक बातमी, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन 11.50 टक्क्यांनी वाढले
- मायावतींनी आत्तापर्यंत पोसलेले गुंड आता चालले ओवैसींच्या आश्रयाला; आधी अतिक अहमद, आता मुख्तार अन्सारीला ऑफर
- संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर