वृत्तसंस्था
कोलकता : कोलकता हायकोर्टाने पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला आज जबरदस्त दणका दिला. संदेशखाली मधल्या महिला अत्याचाराचा मास्टर माईंड शहाजहान शेख याला मुसक्या आवळून ताबडतोब कोर्टासमोर हजर करा, असा स्पष्ट आदेश कोलकता हायकोर्टाने ममता बॅनर्जी सरकारच्या पोलिसांना दिला. त्यामुळे सरकार आणि पोलीस आता मुळापासून हादरले आहेत. On Calcutta High Court’s order on the arrest of Sheikh Shahjahan in the Sandeshkhali case
शहाजहान शेख याला अटक करण्याचे कोणतेही आदेश कुठल्याच कोर्टाने दिले नसल्याचा गैरसमज ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पसरवले होते. परंतु कोलकत्ता हायकोर्टाने हे सगळे गैरसमज आपल्या स्पष्ट आदेशात आज दूर केले. संदेशखाली मधल्या महिला अत्याचाराच्या घटना आणि घडामोडी अत्यंत भयावह आहेत. या अत्याचाराचा मास्टर माईंड पोलिसांना सापडत नसेल तर ती शरमेची बाब आहे. पोलिसांनी ताबडतोब कायदेशीर कारवाई करून शहाजहान शेख याला 48 तासांमध्ये अटक करून कोर्टासमोर हजर करावे, असे कोलकता हायकोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले. त्यामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संदेशखालीतील महिला अत्याचार आणि जमीन बळकवण्याच्या सगळ्या प्रकरणात पूर्ण “एक्स्पोज” झाले.
शहाजहान शेख याच्याविरुद्ध संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये संतापाचे वातावरण उसळले आहे. संदेशखालीतल्या अत्याचार पीडित महिलांनी तर त्याच्या भावाचे शेत आणि फार्म हाऊस जाळून टाकले. परंतु, शहाजहान शेख संदेश खालील पळून जाऊन लपून बसला. तो नेमका कुठे आहे याची पोलिसांना माहिती नसल्याचा दावा पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली केला. परंतु हायकोर्टाने पोलिसांचे कुठलेच आर्ग्युमेंट बिलकुल ऐकून घेतले नाही. त्या उलट राज्यातल्या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि पोलिसांचीही आहे, असे स्पष्ट सुनावत त्यांना संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शहाजहान शेख याच्या अटकेचे आदेश दिले.
शहाजहान शेख याच्याविरुद्ध केवळ महिला अत्याचाराचे किंवा जमिनी बाळकावण्याचेच गुन्हे दाखल नाहीत, तर काही खुनाचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य खूप वाढले आहे. ममता बॅनर्जी सरकारने येत्या 48 तासांत शहाजहान शेख याला अटक केली नाही, तर त्याच्या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआय कडे जाण्याचा जाण्याची शक्यता आहे आणि त्यातून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला थेट कायदेशीर धोका उत्पन्न होण्याचीही शक्यता मानली जात आहे.
भाजपच्या नेत्या आणि कोलकत्ता हायकोर्टातल्या प्रसिद्ध वकील प्रियांका टिबरेवाल यांनीही केस दाखल केली आहे आणि त्यावरच कोलकत्ता हायकोर्टाने ममता बॅनर्जींच्या सरकारला जबरदस्त दणका दिला आहे.
On Calcutta High Court’s order on the arrest of Sheikh Shahjahan in the Sandeshkhali case
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचे जनतेला खुले पत्र, भाजपसोबत जाण्याविषयी स्पष्ट केली भूमिका; मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास
- जरांगेंनी फडणवीसांची माफी मागावी, अन्यथा ओबीसी मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा!!
- जरांगेंची भाषा “राजकीय”, ठाकरे – पवारांच्या स्क्रिप्टनुसारच जरांगे बोलतात!!; शिंदे – फडणवीसांचे संयमी, पण ठाम प्रत्युत्तर!!