वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातला बुलडोझर न्याय बंद व्हायला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने जरूर सांगितले, पण ज्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावले पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांची मुलाखत घेतली घेतली. या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी अनेक विषयांवर परखड मते व्यक्त केली. Bulldozer Baba
देशातल्या बुलडोझर न्याय बंद व्हायला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले तरी देखील बुलडोझर चालूच आहेत. नागपूरच्या दंग्यानंतर देखील बुलडोझर चालला, असा सवाल विचारल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले, ज्याला जो न्याय वाटेल, तो प्रत्येकालाच मिळाला पाहिजे, पण जर कोणी कायदाच कायम हातात घेत असेल आणि हिंसाचार करण्यातच पुढे असेल, तर त्याला त्याच भाषेत समजावले पाहिजे. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत समजावणे हे आमचे काम आहे. कोणी हिंसाचार करू लागला आणि आपण त्याच्यासमोर हात पसरून दयेची भीक मागून लागलो तर कसे चालेल??, हिंसाचार करणाऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. कायद्याच्या कक्षेत राहून देखील हिंसाचार करणाऱ्याला चोख उत्तर देता येते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
राहुल गांधींसारखे “नमुने” राजकारणात पाहिजेत
राहुल गांधींसारखे “नमुने” भारतीय राजकारणात राहिले पाहिजेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग सोपा होतो, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना हाणला, पण काँग्रेसचे खासदार सुरेश यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेत राहुल गांधींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर द्यायची गरज नाही, असे सांगितले.
राहुल गांधींविषयी प्रश्न विचारल्याबरोबर योगी म्हणाले, भारताच्या राजकारणात राहुल सारखे “नमुने” राहिले पाहिजेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग सोपा होतो. राहुल गांधी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी मते व्यक्त करतात त्यामुळे जनतेचे मनोरंजन होते, पण जनतेला आमचे महत्त्वही समजते. म्हणून जनता आम्हाला सत्ता देते, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना हाणला.
उत्तर प्रदेशातील संभलच्या मुद्द्यावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आतापर्यंत तिथल्या खोदकामांमध्ये 54 मंदिरे सापडली. आम्ही आणखी खोदकाम करू. तिथे आणखी मंदिरे सापडतील. संभल मधले सगळे सत्य आम्ही जगासमोर आणू. आक्रमणकर्त्यांनी मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या हे सत्य जगाला समजू द्या. मथुरेचाही लवकरच नंबर लागेल कारण ती श्रीकृष्ण जन्मभूमी आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करतो, नाहीतर आतापर्यंत तिचे बरेच काही वेगळेच घडू शकले असते, असा इशाराही योगी आदित्यनाथ यांनी दिला. उत्तर प्रदेशात मुस्लिम समाज सर्वात जास्त सुरक्षित आहे. जोपर्यंत हिंदू सुरक्षित आहे, तोपर्यंत मुस्लिम समाजही सुरक्षित आहे, असे गंभीर वक्तव्य देखील योगी आदित्यनाथ यांनी केले.
On being asked about mosques covered with tarpaulin in Sambhal, UP CM Yogi Adityanath
महत्वाच्या बातम्या
- AIADMK तामिळनाडूत भाजप + अण्णा द्रमुक होतेय पुन्हा एकी; स्टालिन अण्णांची उद्ध्वस्त करण्या खेळी!!
- Kangana Ranaut : कुणाल कामरा वादावर कंगना राणौत म्हणाल्या, ‘दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी लोक…’
- देशभरातल्या 32 लाख गरीब मुस्लिम परिवारांना ईद पूर्वी “सौगात ए मोदी” किट; भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा उपक्रम!!
- Rekha Gupta : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या प्रत्येक वर्गाला दिली भेट!